Fact Check: तालिबान्यांनी खरंच हेलिकॉप्टरला मृतदेह टांगून शहरातून फिरवला का?
Fact Check: तालिबान्यांनी खरंच हेलिकॉप्टरला मृतदेह टांगून शहरातून फिरवला का? काय आहे व्हायरल व्हिडीओचं सत्य?;
अमेरिकेनं लष्कराने अखेर 31 ऑगस्ट पुर्वी अफगाणिस्तान सोडलं आहे. मात्र, अफगाणिस्तान सोडण्यापुर्वी अमेरिकेने आपले काही लष्करी साहित्य काबुलच्या हमीद करझई विमानतळावर सोडलं आहे. त्यामध्ये जवळपास 75 विमानं, 100 गाड्यांसह इतर काही उपकरणांचा समावेश आहे. काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी हे सर्व लष्करी साहित्य पुन्हा वापरात येऊ नये म्हणून अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांनी ते नादुरुस्त केलं असल्याचं वृत्त दिलं आहे.
मात्र, या दरम्यान एक मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. एका हेलिकॉप्टरला एक व्यक्ती लटकलेला असल्याचं पाहायला मिळालं. या व्यक्तीचा हा व्हिडीओ अमेरिकेच्या हेलिकॉप्टरला तालिबान्यांनी एका माणसाला लटकवलं असल्याच्या आशयाने व्हायरल झाला आहे. या झी न्यूज मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट केलं आहे.
काय आहे सत्य?
या संदर्भात आम्ही गुगल की वर्ड सर्चचा वापर केला असता, आम्हाला ट्वीटरवर काही ट्वीट आढळले. त्यामध्ये अफगाणिस्तानमधील कंदाहर परिसरात हेलिकॉप्टर अशा प्रकारे उडाल्याचं प्रथमत: दिसून आलं.
हा दोर त्याच्या पाठीला बांधण्यात आल्याचं दिसून येतं. तसंच याच व्हिडीओमध्ये 15 सेकंदानंतर हा माणूस हालचाल करत असल्याचं देखील दिसून येतं.
अफगाणिस्तानमधील न्यूज Aśvaka - آسواکا News Agency ने देखील हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
निष्कर्श:
एकंदरीत जगभरात तालिबान्यांनी अमेरिकन हेलिकॉप्टरला एका व्यक्तीला लटकवलं अशाच आशयाने मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र, सदर हेलिकॉप्टरला लटकलेला व्यक्ती कंदाहरमधील 100 मीटर उंचीच्या खांबावर ध्वज लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.