Fact Check: न्यूयॉर्क टाइम्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'पृथ्वीची शेवटची आशा' म्हटलं आहे का?
सध्या भारतात सोशल मीडियावर न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रन्ट पेजचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला जात आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेसोबत छापलेल्या वृत्ताला, 'पृथ्वीची शेवटची सर्वोत्तम आशा' असं हेडलाईन दिलं आहे.
या बातमीचं उप-शीर्षक 'जगातील सर्वात प्रिय आणि सर्वात शक्तिशाली नेता, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी येथे आहे'. असं उपशिर्षक देण्यात आलं आहे.
या व्हायरल होणाऱ्या स्क्रीन शॉट ची सत्यता तपासून पाहण्याचा प्रयत्न आम्ही केला.
(व्हायरल होणारा फोटो)
यासाठी आम्ही न्यूयॉर्क टाइम्स चा रविवार अंक (2 सप्टेंबर 2021) चा अंक पाहिला. पहिल्या पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणताही अग्रलेख नाही. न्यूयॉर्क टाइम्सच्या रविवार आवृत्तीचे हेडलाईन पेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तसंच आम्हाला न्यूयॉर्क टाइम्समध्ये अलीकडच्या काळात मोदींच्या संदर्भात असं संबोधणारं कोणतेही वृत्त आम्हाला वाचायला मिळालं नाही. ज्या आर्टिकलमध्ये मोदी यांची अशा प्रकारे कौतुक केलं आहे.
दरम्यान न्यूयॉर्क टाइम्सच्या अंकात छापलेला फोटो आम्ही रिव्हर्स सर्च इमेज च्या साहाय्याने सर्च केला असता, सदर फोटो गुजरातमधील साबरमती आश्रमामधील असल्याचं समोर आलं. गुजरात टू डे च्या फोटो मध्ये हे स्पष्टपणे दिसून येतं.
तसंच हा फोटो भारत सरकारच्या 'Press Information Bureau' च्या वेबसाईटवर देखील पाहायला मिळतो. या ठिकाणी हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आक्षमातील Visitor book मध्ये 12 मार्च 2021 ला सही करत असल्याचं दिसून येतं.
दरम्यान या लेखाला जे शिर्षक दिलं आहे. ते शिर्षक देखील 'लास्ट बेस्ट होप ऑफ अर्थ' हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचं लोकप्रिय वाक्य आहे. अमेरिकेत निर्माण झालेल्या गृहयुद्धाच्या संदर्भात त्यांनी अमेरिका, स्वातंत्र्य आणि लोकशाही संदर्भात सदर वाक्याचा उल्लेख केल्याचं आढळून येतं.
या संदर्भात एक पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव देखील The Last Best Hope of Earth – Abraham Lincoln & the Promise of America (Paper): Abraham Lincoln and the Promise of America असं आहे. हे पुस्तक Amazon वर विक्रीसाठी देखील उपलब्ध आहे. संदर्भात सुधाकर जाधव यांनी देखील फेसबूक वर पोस्ट करत भाजपच्या सोशल मीडिया टीमवर निशाणा साधला आहे.
निष्कर्ष:
एकंदरींत मोदी यांचा न्यूयॉर्क टाईम्स च्या नावाने व्हायरल होणारी बातमी खोटी असून सदर व्हायरल होणारा फोटो शॉप करण्यात आला आहे.