Fact Check: मनमोहन सिंह सरकारच्या कार्यकाळ फक्त एका AIIMS ची निर्मिती झाली का?

मनमोहन सिंह सरकारच्या काळात फक्त 1 एम्सची निर्मिती झाली का? मोदी सरकारच्या मंत्र्यांचा दावा खरा की खोटा? नक्की काय आहे सत्य वाचा...;

Update: 2021-04-28 16:57 GMT

देशात कोरोना वाढला असताना लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत. या टिकेला उत्तर देण्यासाठी भाजप समर्थक सोशल मीडियावर काही पोस्ट करत आहेत.

मागील पंतप्रधानांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात सर्वात जास्त एम्स रुग्णालय बांधण्यात आल्याचा दावा अनेक भाजप नेते आणि भाजप समर्थक ट्विटरद्वारे करीत आहेत. त्याचबरोबर एक इन्फोग्राफिक्सही सोशल मीडियावर व्हायरल केलं जात आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ वर्षाच्या काळात एकूण १५ एम्स रुग्णालयं सुरु करण्यात आल्याचं दिसून येतं. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या काळात केवळ 1 एम्स रुग्णालयाची स्थापना झाल्याचं म्हटलं आहे.

अनेक भाजप नेत्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे. बिहार सरकारमध्ये मंत्री असणारे नंद किशोर यादव यांनी देखील हे ट्विट केलं आहे.

ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात -

हे आकडे पाहिल्यानंतर कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष मोदी सरकारलाच बदनाम करतील.

त्याचबरोबर राजकीय विश्लेषक अभिनव प्रकाश यांनीही ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एम्स रुग्णालय तयार करण्याची घोषणा केली होती, आणि त्यापैकी ११ एम्सचे काम देखील सुरु झालं आहे.

काय म्हटलंय अभिनव प्रकाश यांनी ट्विट करत -

History will not judge Manmohan Singh kindly... असं म्हणत मनमोहन सिंह यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलेल्या वाक्याला टोला लगावला आहे.

भाजपा समर्थक अरुण पुदूर यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये काँग्रेसवर टीका करताना

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या १० वर्षांच्या काळात एक एम्स रुग्णालय तयार केलं. ते ही इटालियन माताच्या मतदार संघात...

त्याबरोबरच अभिषेक द्विवेदी, @Rezang_La, @SaffronTommy, @beingGavy यांसारख्या अनेक ट्विटर हँडलवरून या आशयाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहेत. अनेकांनी त्या रिट्विट देखील केल्या. @SaffronTommy यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये

"मोदी सरकारने देशात 14 एम्स रुग्णालय तयार केले तर मनमोहन सिंग यांनी केवळ 1 एम्स तयार केले."

फेसबुकवरही अनेकांनी ही पोस्ट वायरल केली आहे.

प्रो-मोदी फेसबूक पेज 'मार्केटिंग मोटिव्हेशन' ने ही या पोस्ट केल्या आहेत. या पोस्टला प्रचंड लाईक्स मिळाल्या आहेत.

काय आहे प्रकरण आणि त्यामागील सत्य ?

फॅक्ट नंबर1...

भारतात पहिले एम्स रुग्णालय १९५६ मध्ये देशाचे पहिले आरोग्यमंत्री अमृत कौर यांच्या नेतृत्वात उभे राहिले. त्यानंतर आणखी 6 एम्सची निर्मिती करण्यात आली. 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 'प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना' सुरू केली. ही योजना सुरु करण्यामागचा उद्देश "स्वस्त, विश्वसनीय आरोग्य सेवेत होणारे घोटाळे थांबवणे आणि देशातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे" हा होता. "

2003 च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात तत्कालीन पंतप्रधानांनी पुढील तीन वर्षांत 'प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)' अंतर्गत मागासलेल्या राज्यांमध्ये दिल्लीतील एम्ससारख्या आधुनिक सुविधा असलेले 6 नवीन रुग्णालये तयार करण्याची घोषणा केली होती. मात्र, वाजपेयी सरकार अवघे 9 महिनेच सत्तेवर राहिली.

फॅक्ट नंबर 2

द न्यू इंडियन एक्सप्रेस की 2011 की रिपोर्ट के मुताबिक, "NDA सरकार चुनावी वादों वाले मोड में ही रही और अक्टूबर 2003 से मार्च 2004 के बीच बिना ज़मीन की पुख्ता कागज़ी कार्रवाई के महज़ आधारशिला रखने का काम करती रही."

त्यानंतर, यूपीए (UPA) सरकारच्या कारकिर्दीत ६ एम्स रुग्णालये बांधण्यात आली. २०११ च्या द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,"एनडीए सरकारने निवडणूकीत फक्त आश्वासन देत राहिली. ऑक्टोबर 2003 ते मार्च 2004 दरम्यान जमीन हस्तातरांच्या कोणत्याही कागदपत्राशिवाय एनडीए सरकार फक्त उदघाटन करत राहिली.

https://www.newindianexpress.com/thesundaystandard/2011/jun/12/six-years-later-government-clears-new-aiims-261843.html

पुढे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की...

केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्च २००६ मध्ये यूपीएची सत्ता येताच या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजूरी देण्यात आली. त्यानंतर तब्बल 6 वर्षानंतर, सर्व परवानग्या मिळाल्यानंतर त्यांचे काम 2009 मध्ये सुरू झाले. २०१० मध्ये कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आले आले.

फॅक्ट नंबर 3

पीएमएसएसवायच्या पहिल्या टप्प्यात भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पटना, रायपूर आणि ऋषिकेश या ६ ठिकाणी एम्स रुग्णालय उभारण्यात आले होते. पीएमएसएसवाय च्या वेबसाइटनुसार २०१२ मध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम तर २०१३ मध्ये नर्सिंगचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला होता.

म्हणजेच यूपीए आणि एनडीए या दोन्ही सरकारच्या कार्यकाळात एम्सची निर्मिती वेगवेगळ्या टप्प्यांवर झाली आहे. भोपाळ मधील एम्समध्ये मेडिकल कॉलेज आणि ओपीडी 2013 मध्ये सुरु करण्यात आली होती. तर रुग्णांना अडमीट करुन घेण्याची सेवा (IPD) आणि प्रायव्हेट वॉर्ड्स २०१४ आणि २०१७ मध्ये सुरु करण्यात आली. 2019 च्या CAG च्या अहवालात असे सांगितले गेले होते की, या नव्या एम्स रूग्णालयांच्या निर्मितीचे काम अजून पूर्ण झालेले नसून ते दिल्लीच्या एम्सप्रमाणे पूर्णतः कार्यरत नाही.

आता इथं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की…

व्हायरल झालेल्या यादीमध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारला ज्या 6 एम्स रुग्णालायचं श्रेय दिलं जात आहे. ते तर कॉंग्रेस सरकारच्या काळात बांधण्यात आली आहेत. या रुग्णालयाला कॅबिनेटची मंजूरी देखील कॉंग्रेसने दिली. अटलबिहारी यांच्या सरकारने फक्त घोषणा दिल्या आणि मंजूरी नसताना उद्घाटन केले.

फॅक्ट नंबर 4...

देशातील एम्स रुग्णालयांच्या स्थितीबद्दल बोलताना आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी गेल्या वर्षी म्हंटले होते की...

पीएमएसएसवाय अंतर्गत 22 एम्स रुग्णालयांची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी 6 भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, पटना, रायपूर आणि ऋषिकेश येथे कामकाज सुरु झालं आहे. उर्वरित 16 एम्सचे काम अद्याप सुरू आहे.

या 16 एम्सपैकी रायबरेली येथे स्थापन झालेल्या पीएमएसएसवायच्या दुसर्‍या टप्प्यातील एम्सला मनमोहन सिंह सरकारने मान्यता दिली होती. द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, केंद्र सरकार मंजूरी दिल्यानंतर तब्बल 1 दशकानंतर ऑगस्ट 2018 मध्ये राय बरेली येथे आउट पेशेंट डिपार्ट्मेंट (OPD) बाहेरच्या रुग्णांना सेवा देण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. उर्वरित 15 एम्सची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. त्यापैकी काही एम्समध्ये आउट पेशेंट डिपार्ट्मेंट (बाहेरील रुग्णांना दिली जाणारी सुविधा) (OPD) आणि वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाले आहेत.

नक्की काय आहे सत्य?

एकंदरीत सोशल मीडियावर व्हायरल यादीद्वारे दिशाभूल केली जात आहे. आतापर्यंत 7 एम्स पूर्णपणे कार्यरत झाले असून दिल्लीच्या एम्सचा देखील यात समावेश आहे. उर्वरित ६ एम्सची घोषणा भाजप सरकारच्या कार्यकाळात झाली होती, परंतु त्यांचे बांधकाम कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाले. रायबरेली एम्सची निर्मितीही कॉंग्रेस सरकारच्या काळात झाली होती. मात्र, भाजप सरकारच्या कारकीर्दीत ओपीडी सेवा सुरू केली गेली. भाजपच्या कार्यकाळात १५ एम्सची घोषणा करण्यात आली आहे. परंतु सध्या काहींचे बांधकाम सुरु आहे तर काही रुग्णालयात कमी अधिक प्रमाणात सेवा सुरू झाल्या आहेत.

Tags:    

Similar News