FactCheck शरद पवार यांनी मोदींना हरवण्यासाठी मुस्लिमांना घेऊन या असं आवाहन केलं का ?
राज्यात विधानसभा पोटनिवडणुकांच्या निमित्ताने शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक बैठकीत एक विडियो, भाजप ने समोर आणला आहे. ज्या मध्ये शरद पवार यांनी आवाहन केलं आहे की “पोट निवडणुकीत मृतांचे पण मतदान घडवा” अश्या प्रकारचे वक्तव्य कॉंग्रेस च्या नगरसेवकाने केले आहे. असा व्हिडिओ भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुढे आणला, आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने हा बैठकीतला विडियो प्रसारित केला त्यामुळे अनेक वादांना सामोरे जावे लागले.
पुण्यात भाजपने अल्पसंख्याकांसाठी परिषद आयोजित केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे नेते आणि माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी यावेळी भाषण केले. ``२६ तारखेला निवडणुकीचा दिवस आहे. सौदी अरेबियाच्या दुबईला भेट दिलेल्या प्रत्येकाला कॉल करा. सर्वांनी मतदानाची खात्री करा. आणि ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांना पण बोलवा जेणेकरून ही लढाई आपण जिंकू आणि जो पर्यन्त आपण सगळे एकत्र येऊन मतदान करत नाही तो पर्यन्त मोदीला हरवू शकणार नाही, फक्त ९९ टक्के नाही तर १०० टक्के मतदान झालं पहिजे. त्याच बरोबर मला अस बोलायच आहे की सगळ्या युवा पिढीने फुढे येऊन, मतदान करा जेणेकरून ही लढाई आपण जिंकून दाखवू. शरद पवार यांच्या उपस्थितीत इतकच बोलायच होतं. मी माझं माझं भाषण इथेच थांबवतो. अल्ला हाफिज. असा विडियो जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने प्रसारीत केला. भाजपच्या देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), केशव उपाध्ये, चित्रा वाघ यांनी हिरोली यांच्या भाषणावर जोरदार टीका करताना राष्ट्रवादीवरही निशाणा साधला आहे.
यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीवर म्हणाले, शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अल्पसंख्यांकाच्या यांच्या बैठकीमध्ये मोदी आणि आरएसएस (RSS- Rashtriya Swayamsevak Sangh ) यांना पराभूत करायचे असेल तर वाटेल ते करा. सौदीवरुन लोकं आणा दुबईवरुन लोकं आणा आणि जे मेलेत त्यांना सुद्धा उपस्थित करा. पण २६ तारखेला RSS आणि मोदी ला पराभूत करण्यासाठी एक व्हा. असे आवाहन कॉंग्रेस च्या नगरसेवकांनी केलं आहे. निवडणूका जिंकण्यासाठी किती खालच्या पातळीवर जातायं, याचं उदाहरण हे आहे. इथे बोगस मतदानाचा कट चालू आहे का ? आमची निवडणूक आयोगाला मागणी आहे याची तातडीने दखल घेतली पाहिजे.
या नंतर मराठा समन्वयक दिलीप पाटील यांनी जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीवर असे प्रतिपादन केले की, आमचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त एक धर्माचे किंवा एकाच जातीचेच का बघता, मराठा समाजाचे भरपूर प्रश्न आहेत. त्या प्रश्नांना घेऊन आम्ही त्यांच्या कडे गेलो त्या बद्दल बोललो तर त्या बद्दल ते कधीही बोलायला तयार नाहीत, आता मात्र बोलत आहेत की मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान कारा मी त्यांचे प्रश्न सोडवतो. पवार साहेब जर तुम्हाला मुस्लिम समाजाचे १०० टक्के मतदान पाहिजे असेल, तर याचा अर्थ मराठा समाजाची मतं नकोयत का ? असा सवाल दिलीप पाटील यांनी शरद पवारांना केला आहे.
यावर जय महाराष्ट्रवरील चर्चेनंतर वैभव कोकाट यांनी ट्वीट करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि शरद पवार यांना समर्थन करत लिहिले की , जय महाराष्ट्र चॅनेलचा खोडसाळपणा, असे कोणतेही वक्तव्य शरद पवारांनी केलेलं नाही. जय महाराष्ट्र चॅनेलने शरद पवारांच्या फोटोसहित ते चालवले, पुढे भक्तांनी हेच SS अनेक ग्रुपवर फिरवले. विनय सहस्त्रबुद्धेने पण ट्विट केले.
प्रसाद काथेच्या जय महाराष्ट्र चॅनेलचा खोडसाळपणा,
— Vaibhav Kokat (@ivaibhavk) February 24, 2023
असे कोणतेही वक्तव्य शरद पवारांनी केलेलं नाही. जय महाराष्ट्र चॅनेलने शरद पवारांच्या फोटोसहित ते चालवले, पुढे भक्तांनी हेच SS अनेक ग्रुपवर फिरवले. विनय सहस्त्रबुद्धेने पण ट्विट केले.
नेहमीप्रमाणे @NCPspeaks बघ्याच्या भूमिकेत... pic.twitter.com/oB3E1LU2nm
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट पोस्ट करत असे प्रतिपादन केले की, ह्याचा मालक सुधाकर शेट्टी ह्याच्यावर पवार साहेबांचे अगणित उपकार आहेत … धडा शिकवावा लागेल मी कोरोना काळात आजारी होतो तेव्हा ह्यांनीच लिहले होते गाडायचा की जाळायचा @ivaibhavk
ह्याचा मालक सुधाकर शेट्टी ह्याच्यावर पवार साहेबांचे अगणित उपकार आहेत … धडा शिकवावा लागेल
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 24, 2023
मी कोरोना काळात आजारी होतो तेव्हा ह्यानीच लिहले होते गाडायचा की जाळायचा@ivaibhavk https://t.co/piUOQGWGP3
राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष-महाराष्ट्र प्रदेशाचे मीडिया समन्वयक सूरज चव्हाण यांनी ट्वीट करत असे प्रतिपादन केले की, शरद पवार साहेबांनी असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. @JayMaharashtrN चॅनेलने पवार साहेबाच्या फोटोसहित बातमी चालवली जाणून बुजून धार्मिक द्वेष पसरवण्याचा उद्देश हा भारतीय जनता पार्टीचा मीडिया पार्टनर असलेल्या चॅनलचा दिसतोय. जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला समोर जावे लागेल.
शरद पवार साहेबांनी असे कोणतेही वक्तव्य केलेलं नाही.@JayMaharashtrN चॅनेलने पवार साहेबाच्या फोटोसहित बातमी चालवली जाणून बुजून धार्मिक द्वेष पसरवण्याचा उद्देश हा भारतीय जनता पार्टीचा मीडिया पार्टनर असलेल्या चॅनलचा दिसतोय.जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कार्यवाहीला समोर जावे लागेल pic.twitter.com/sEIU0pcfAC
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) February 24, 2023
दरम्यान अनेक ट्वीट वापरकर्त्यांनी ट्वीट करून जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने शरद पवार यांच्या विरोधात केलेल्या चुकीचं असल्याचं सांगितलं.
स्क्रीन शॅाटमधील असे कोणतेही वक्तव्य खासदार श्री.शरद पवार यांनी प्रत्यक्षात न करताही चुकीची बातमी देणाऱ्या जय महाराष्ट्र या न्युज चॅनेलवर आणि सोबत वाहीनीचा संपादक प्रसाद काथेवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. @MahaCyber1 @puneruralpolice @DGPMaharashtra @PawarSpeaks
स्क्रीन शॅाटमधील असे कोणतेही वक्तव्य खासदार श्री.शरद पवार यांनी प्रत्यक्षात न करताही चुकीची बातमी करणा-या जय महाराष्ट्र या न्युज चॅनेलवर व सोबत वाहीनीचा संपादक प्रसाद काथेवर तात्काळ गुन्हा दाखल व्हावा. @MahaCyber1 @puneruralpolice @DGPMaharashtra @PawarSpeaks pic.twitter.com/clQ8JM42bY
— Nitin Yadav (@nitin_s_yadav) February 24, 2023
संतोष ट्वीट वापरकर्ता, संतोष यांनी सुद्धा ट्वीट करून सुप्रिया सुळे यांना आव्हान केले, @supriya_sule ताई, कोण पदाधिकारी आहेत, NCP चे IT cell वाले पगार घेणारे, हे बघा आणि कारवाई करायला सांगा.
@supriya_sule ताई, कोण पदाधिकारी आहेत, NCP चे IT cell वाले पगार घेणारे, हे बघा आणि कारवाई करायला सांगा. https://t.co/nIVMzqz1iL
— संतोष (@WeVsWEF) February 24, 2023
राष्ट्रवादी समर्थकांनी आणि शरद पवार समर्थकांनी संतापजनक भुकीक मांडली आणि ट्वीट केल , तो काथे... 'काथ्याकूट' नेहमी करतो असे ट्वीट संदीप कांबळे यांनी केले.
तो काथे... 'काथ्याकूट' नेहमी करतो https://t.co/iqso47JvWr
— sandeep kamble (@sandykamble24) February 24, 2023
एकलव्य यांनी ट्वीट करून माफी मागायला सांगा असे सांगितले.
काथेला माफी मागायला लावा.
— एकलव्य 🏹💙 (@31lJO9vjVgi6dxT) February 24, 2023
😡😡😡 https://t.co/RIINWtLEcg
आम्ही बाळा साहेबांची मानस, या ट्वीट वापारकर्त्यांनी याला @NCPspeaks @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @amolmitkari22 @Jayant_R_Patil @supriya_sule यांना टॅग करून उत्तर देणार नाही का??? असा प्रश्न विचारला.
याला @NCPspeaks उत्तर देणार नाही का???@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @amolmitkari22 @Jayant_R_Patil @supriya_sule 👇👇👇🙆♂ https://t.co/wtF3zRMXGw
— आम्ही बाळासाहेबांची माणसं.. (@Loktantra2020) February 24, 2023
तथ्य तपासणी :
पुण्यात भाजपने अल्पसंख्याकांसाठी परिषद आयोजित केली होती. नगरचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे प्रमुख राजकारणी आणि माजी नगरसेवक उस्मान हिरोली यांनी यावेळी मुस्लिमांना मतदानासाठी प्रोत्साहित करणारे भाषण केले. २६ तारखेला निवडणुकीचा दिवस आहे. सौदी अरेबियाच्या दुबईला भेट दिलेल्या प्रत्येकाला कॉल करा. सर्वांनी मतदानाची खात्री करा. सौदी अरेबिया, दुबई आणि कुवेतमध्ये कसबा मतदारसंघातील सुमारे 1500 मुले-मुली राहतात. मी त्यांना मतदान करण्याची सूचना केली. काँग्रेसचे माजी नगरसेवक उस्मान हिरोली, यांचे असं वक्तव्य होते की, मी तुम्हाला त्या दिवशी या मुलांशी बोलायला सांगितले कारण ते येत-जात राहतात. मतदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मी हा शब्द शेजारच्या लोकांपर्यंत पोहोचवला. अधिकाधिक मतदार तयार करणे हे ध्येय आहे. या माझ्या भाषणातून ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी गेली त्यांना मतदानाचा सल्ला देण्यात आला. मतदानासाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या. हिरोली यांनी स्पष्ट केले की त्यांच्या विधानाचा अर्थ असा होतो की मत म्हणजे दुसरे काही नाही. यावर शरद पवार यांनी कोणतेही विधान केले नाही. आणि सोशल मीडिया वर कुठेही शरद पवार यांच्या तर्फे कोणतेही वक्तव्य केले गेले नाही. मोदींना हरवण्यासाठी मुसलमानांना घेऊन या असं आव्हान फक्त काँग्रेसचे उस्मान हिरोली यांनी मुस्लिम बांधवांना प्रोत्साहन करण्यासाठी केले होते. या पाठीमागे शरद पवार यांच्या वर खोटा आरोप केला गेला आहे आणि जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने चावलेला विडिओ चुकीच्या पद्धतीने दाखवला गेला आहे. असे कोणतेही वक्तव्य शरद पवारांनी केलेलं नाही. जे जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीने शरद पवारांच्या फोटोसहित चालवले.