Fact check: मुस्लीम समाजाच्या लोकांनी गंगा नदीत नमाज अदा केला? काय आहे सत्य
Fact check: मुस्लीम समाजाच्या लोकांनी गंगा नदीत नमाज अदा केला? काय व्हायरल व्हिडीओचं सत्य जाणू घ्या.. Fact Check: Old video from Bangladesh gone viral with communal spin;
सध्याच्या काळात सोशल मीडियावर बनावट बातम्या, खोट्या अफवांचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काही लोक पाण्यात उभे असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शमध्ये लिहिले आहे की,
"गंगा नदीत अजानसह एक निर्जन जागा व्यापण्याची ही योजना आहे. त्यांच्या योजनेनुसार, गंगा नदीच्या काठावर तात्पुरते निवासस्थान बांधले गेले पाहिजे, नंतर ते कायमस्वरूपी निवासस्थानात रूपांतरित केले जाईल. कारण जगाची पुढील लढाई पाण्यासाठी आहे. आणि मा गंगाचं पाणी आता अबे जमझम बनवण्याचा हा प्रयोग सुरु झाला आहे! "
फेसबुक युजर संजय सिंह यांनी हा संदेश याच संदेशासह पोस्ट केला आहे.
'I Love Modi JI' या फेसबुक पेजनेही हा व्हिडिओ याच दाव्यासह पोस्ट केला आहे.
फेसबुक ट्विटर वर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ फ्लोरिडा, भारत, महाराष्ट्र याप्रमाणे यूट्यूबवरही अपलोड करण्यात आला आहे.
काय आहे सत्य?
Google वर कीवर्ड शोधत असताना, आम्हाला 25 मे 2020 चा ढाका ट्रिब्यून लेख सापडला. या अहवालात शेअर केलेले छायाचित्र व्हायरल व्हिडिओचे आहे. लेखात असे म्हटले आहे की, बांगलादेशच्या खुलनाच्या कोईरा उपजिल्हामध्ये अम्फान वादळामुळे पूर आला होता. यामुळे, ईद-उल-फितरच्या निमित्ताने लोकांनी गुडघाभर पाण्यात नमाज अदा केली. तसेच 180 किमी प्रतितास वेगाने आलेल्या वादळाने खूप मोठ्याप्रमाणात नुकसान केल्याचं म्हटलं आहे.
कोईरा सदर उपजिल्हा परिषदेचे अध्यक्ष मोहम्मद हुमायूं कबीर यांनी सांगितले होते की, पुरामुळे सुमारे 3 हजार लोकांनी शहरात 3 वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना केली होती.
खाली व्हायरल व्हिडिओचा स्क्रीनशॉट आणि मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या प्रतिमेची तुलना आहे.
बांगलादेशी वृत्तपत्र डेली सन, बांगला मिररने कोयरामध्ये आलेल्या पुरामुळे पाण्यात प्रार्थना ची बातमी दिली.
अशाप्रकारे, २०२० मध्ये आलेल्या पुरामुळे बांगलादेशमध्ये पाण्यात उभे राहून प्रार्थना करण्याचा व्हिडिओ भारत, फ्लोरिडा म्हणून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ शेअर करून लोकांनी खोटा दावा केला की, मुस्लिम समाजाचे लोक हिंदूंच्या पवित्र गंगा नदीत प्रार्थना करत आहेत.
निष्कर्ष
सदर व्हायरल झालेला व्हिडीओ बांगलादेशचा असल्याचं फॅक्ट चेक मध्ये समोर आलं आहे.