Fact Check: Article 370 रद्द केल्यानंतर फारूख अब्दुल्लांनी राम नामाचे भजन गायले का?
जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारे कलम 370 आणि 35 अ रद्द केले होते. त्यानंतर या निर्णयाला जम्मू काश्मीर राज्यात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. तर जम्मू काश्मीरच्या नेत्यांनीही कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जम्मू काश्मीरच्या नेत्यांना स्थानबध्द करण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फ्रेंसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत फारूक अब्दुल्ला राम नामाचे भजन गात आहेत.
फारूक अब्दुल्ला यांचा राम नामाचे भजन गात असल्याच्या व्हिडीओवर लिहीले आहे की, आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर फारूक अब्दुल्लांमध्ये अद्भुत बदल झाला असल्याचे म्हटले आहे. तर एक ट्वीटर वापरकर्त्याने ट्वीट करून म्हटले आहे की, यांना खूप लवकर आपल्या पुर्वजांची आठवण झाली. तर अल्ट न्यूजने ही पडताळणी करण्याच्या वेळेपर्यंत 4 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिला होता.
फेसबुकवर सुध्दा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
फारूक अब्दुला यांचा भजन गात असल्याचा व्हिडीओ व्हाटस्एपवर सुध्दा व्हायरल होत आहे. त्यामुळे या व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी अल्ट न्यूजच्या हेल्पलाईन नंबरवर लोकांनी रिक्वेस्ट पाठवल्या होत्या.
2019 मध्ये VK News नावाच्या यूट्यूब चॅनलने हा व्हिडीओ याच दाव्यासह अपलोड केला होता.
पडताळणी
युट्यूबवर कि-वर्ड सर्च केल्यानंतर हा व्हिडीओ 21 सप्टेंबर 2009 मध्ये अपलोड केल्याचे अल्ट न्यूजच्या निदर्शनास आले. या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा व्हिडीओ 28 एप्रिल 2001 चा असल्याचे लिहीले आहे. त्यामध्ये पुढे असेही लिहीले आहे की, जम्मूमध्ये झालेल्या एका सत्संगमधील हा व्हिडीओ आहे. ज्यामध्ये फारूक अब्दुला यांनी हे भजन गायले होते.
वाचकांनी लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीरमधून कलम 370 हे 5 ऑगस्ट 2019 रोजी रद्द करण्यात आले होते. तर हा व्हिडीओ 2009 पासून इंटेरनेटवर आहे. त्यामुळे यातून असा निष्कर्ष निघतो की, या व्हिडीओतील फारूक अब्दुला यांनी भजन गाण्याचा कलम 370 सोबत कोणताही संबंध नाही.
अल्ट न्यूज संबंधीत व्हिडीओची पडताळणी करत असताना फारूक अब्दुल्ला यांनी 2013, 2017, 2018 सालीही अशा प्रकारे राम नामाचे भजन गायले होते. तर त्यावेळी केंद्र सरकारने 370 कलम रद्द केले नव्हते.
निष्कर्ष-
यावरून असे दिसून येते की, 2009 पासून इंटरनेटवर असलेले फारूक अब्दुल्लांनी गायलेल्या राम नामाच्या भजनाचा कलम 370 रद्द करण्याशी संबंध नाही. त्यामुळे कलम 370 रद्द केल्यानंतर त्यांच्यात अद्भुत परिवर्तन झाल्याचा दावा खोटा आहे.