राहुल गांधी यांच्या एका भाषणातील व्हिडिओची क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात "तुम्ही पाहिले असेल, तुम्ही गांधीजींचा फोटो पाहिलात. तुम्हाला गांधीजींसोबत 3-4 महिला दिसतील. बरोबर, तुम्ही मोहन भागवत यांच्यासोबत कोणत्या महिलेचा फोटो पहिला आहे का? कधी पहिला आहे का? होऊच शकत नाही. "
दरम्यान, भाजप नेते कपिल मिश्रा यांनीही हा व्हिडिओ ट्वीट करत राहुल गांधींवर टीका केली आहे.
एशियानेट न्यूजने देखील ही व्हिडिओ क्लिप ट्विट केली आहे.
यासोबतच इंडिया टुडेचे कार्यकारी संपादक शिव अरूर यांनीही हा व्हिडिओ ट्विट केला आहे.
ट्विटरसोबतच फेसबूकवरही मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
काय आहे सत्य... ?
दरम्यान, या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही इंडियन नॅशनल काँग्रेसच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओ चेक केले.
यामध्ये 15 सप्टेंबर 2021 ला राहुल गांधी यांनी महिला काँग्रेस दिनानिमित्त महिलांना संबोधित केल्याचा एक व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. दरम्यान, या व्हिडिओमध्ये 17 मिनिटे 52 सेकंदांनंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमधील भाग पाहायला मिळतो. मात्र, व्हायरल क्लिपच्या काही भागानंतर राहुल गांधी म्हणतात. "कारण त्यांची (RSS) संघटना महिला शक्तीला दाबते, चिरडते. पण आमची संस्था महिला शक्तीला एक व्यासपीठ देते." त्यामुळं राहुल गांधी यांचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देत व्हायरल केला जात आहे. हे स्पष्ट होतं.
दरम्यान, ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबैर यांनी शिव व्हिडिओच्या ट्विटचा हवाला देत मूळ व्हिडिओ ट्विट केला आहे.
तसेच, एएनआयचे पत्रकार सिद्धार्थ शर्मा यांनी देखील शिव अरुर यांच्या ट्विटचा हवाला देत म्हंटल आहे की, ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. ते म्हणतात की, हा व्हिडिओ चुकीच्या संदर्भ देऊन शेअर केला जात आहे.
निष्कर्श
एकूणच राहुल गांधी यांचा व्हिडीओ चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल केला जात आहे.
या संदर्भात alt News ने फॅक्ट चेक केलं आहे. https://www.altnews.in/hindi/clipped-video-of-rahul-gandhi-shared-out-of-context/