Fact Check : मुघलांनी चित्तोडच्या मंदिराचं खरंच मशिदीत रुपांतर केलं आहे का?
Fact Check : मुघलांनी चित्तोडच्या मंदिराचं खरंच मशिदीत रुपांतर केलं आहे का?काय आहे व्हायरल होणाऱ्या दाव्याचे सत्य;
मंदिरासारख्या दिसणाऱ्या एका स्ट्रक्चरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मंदिरावर घुमट दिसून येत आहे. त्यामुळे मुघलांनी चित्तोडच्या मंदिराचं मशिदीत रुपांतर केलं आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
भाजपचा सदस्य असलेल्या मेजर सुरेंद्र पुनिया यांनी ट्वीट करून अशाच प्रकारचा दावा केला आहे. मुघल आणि बाकी आक्रमकांची स्थापत्यकला इतकी विचित्र होती की त्यांनी मंदिराच्या पायावर त्यांच्या वास्तू उभारल्या आहेत. तर सुरेंद्र पुनिया यांनी सध्या ताजमहालाच्या तळघरात 22 मुर्ती बंद असल्याच्या कॉन्पिरसीप्रमाणेच हा दावा केला आहे.
ट्वीटर वापरकर्ते @SujinEswar1 आणि @Chetankumar_111 यांनी याच दाव्यासह चित्तोड येथील हिंदू मंदिराचे मुघलांनी मशिदीत रुपांतर केले असल्याचा दावा केला आहे.
हा फोटो अशाच प्रकारच्या दाव्यासह 2020 पुर्वीही ट्वीटर आणि फेसबुकवर शेअर केला जात होता.
पडताळणी :
अल्ट न्यूजने हा फोटो गुगल रिवर्स इमेजमध्ये सर्च केला. त्यामध्ये हा 2011 सालचा एक फोरम आला. तर यात सुदीप्तो रे याने कोलकत्ता ते राजस्थान केलेल्या प्रवासातील फोटो पोस्ट केले होते. त्यात त्याने व्हायरल फोटोसोबत आपल्या पोस्टमध्ये लिहीले होते की, सरळ सरळ एक मंदिर दिसत आहे. ज्याचे रुपांतर मशिदीत करण्यात आले आहे.
फोटो व्हायरल होण्यापुर्वीच्या फोटोमध्येही हा फोटो चित्तोड येथील असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अल्ट न्यूजने गुगलवर काही की-वर्ड्स सर्च केले. त्यामध्ये हा फोटो राजस्थानमधील चित्तोड येथील रतन सिंह पॅलेस येथे असलेल्या एका मंदिराचा आहे, अशी माहिती Alamy वर वर मिळाली.
त्यानंतर अल्ट न्यूजने आणखी काही की-वर्ड्स सर्च केले. त्यात आणखी एक फोटो मिळाला. ज्यामध्ये मंदिराचा पुढचा भाग दिसत आहे. तर या फोटोला दिलेल्या कॅप्शननुसार फोटोत दिसत असलेले मंदिर हे प्राचिन शिवमंदिर होते. त्यामुळे हा फोटो पुन्हा एकदा गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर अल्ट न्यूज विकीपिडीयाच्या वेबसाईटवर पोहचले. तिथे या मंदिराचे नाव श्रुंगार चौरी असल्याचे सांगितले आहे.
अल्ट न्यूजने गुगल अर्थ प्रो चा वापर करून 24°53'33.06″N, 74°38'40.47″E या निर्देशांकावर मंदिराची भौगोलिक स्थिती पाहिली. तर त्यामध्ये मंदिराच्या मागच्या आणि पुढच्या बाजूला रस्ता दिसत आहे.
अल्ट न्यूजने याबाबत आणखी काही की-वर्ड सर्च केल्यानंतर ASI जोधपुर सर्कलच्या वेबसाईटवर श्रुंगार चौरी मंदिराचा आणखी एक फोटो मिळाला.
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या अधिकृत वेबसाईटवर ASI ची अधिकृत कागदपत्रं मिळाली. त्यामध्ये श्रुंगार चौरी मंदिर हे एक जैन मंदिर असून महाराजा कुंभचा कोषाध्यक्ष कोलाच्या मुलाने वेलाका याने 1448 मध्ये बांधले होते.
"भारतीय पुरातत्व सर्वेक्षण: रिपोर्ट ऑफ़ ए टूर इन द पंजाब अँड राजपूताना इन 1883-84 नावाच्या पुस्तकाच्या २३ व्या खंडात लेखक A कनिंघम यांनी लिहीले आहे की, गोदाम आणि गडाच्या मध्ये एक नक्षीदार दगडांचे मंदिर आहे. ज्या मंदिराला श्रुंगार चौरी म्हणून ओळखले जाते. तर हे मंदिर राणा कुंभच्या कोषाध्यक्षाने बांधले आहे. यावरून या मंदिराला स्थानिक लोक वेगवेगळ्या नावाने ओळखतात, असे दिसून आले.
याठिकाणी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, या परिसरातील अनेक मंदिरांवर घुमट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात मंदिरावर घुमट ही सामान्य गोष्ट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इतिहास विभागातील मध्यकाळातील पुरातत्व विभागाचे अभ्यासक MK पुंधीर यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी ते म्हणाले, जेव्हा आक्रमणकारी एखाद्या किल्ल्यावर आक्रमण करायचे. त्यावेळी ते तो किल्ला उध्वस्त करायचे. मात्र यानंतरही श्रुगांर चौरी मंदिरावर घुमट बसवला असल्याचा कोणत्याही प्रकारचा पुरावा नाही. मात्र जर हे आक्रमणकारी शक्तींचे कृत्य असते तर राजपुतांनी हा भाग जिंकल्यानंतर तो घुमट तोडून टाकला असता.
अल्ट न्यूजने पंडित शोभालाल शास्री यांनी संकलित केलेले आणि 1928 मध्ये प्रकाशित करण्यात आलेले चित्तोडगड हे पुस्तक पाहिले. या पुस्तकात श्रुंगार चौरी मंदिराविषयी एक भाग आहे. त्यात असे म्हटले आहे की, मंदिर मुळ स्वरुपात 1277 मध्ये राजा रतनसिंह यांनी बनवले होते. मात्र त्यानंतर 1303 मध्ये चित्तोडला घेरल्यानंतर हे मंदिर उध्वस्त करण्यात आले. तर पुढे 1448 मध्ये कोषाध्यक्ष वेलाका याच्या द्वारे पुन्हा बांधकाम करण्यात आले. मात्र यामध्ये हे मंदिर मशीदीत बदलल्याची कोणत्याही प्रकारची माहिती या पुस्तकात दिली नाही.
निष्कर्ष :
वरील सर्व मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा पुर्णपणे निराधार आहे. तर आक्रमणकारी शक्तींनी देशातील हिंदू मंदिरं उध्वस्त करून त्यावर मशीद बांधल्याच्या काँस्पिरसी हा दावा एक भाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या व्हायरल पोस्ट शेअर करताना त्याविषयी पुर्ण माहिती घेऊनच पोस्ट करायला हव्यात.
Alt News: https://www.altnews.in/hindi/no-this-temple-in-chittor-was-not-converted-into-a-mosque/