Fact Check: पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यादरम्यान 'वंदे मातरम्' च्या घोषणा दिल्या गेल्या का?

Australian Man cheer for India after Australia beat Pak in the T20 World Cup What is reality;

Update: 2021-11-14 04:11 GMT

11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. या पराभवानंतर भारतात सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहेत.या दरम्यान, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये पिवळे कपडे घातलेला एक व्यक्ती 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा देत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, झी सलामने हा व्हिडिओ 11 नोव्हेंबर ला टी-20 विश्वचषकाच्या सेमीफायनल मॅचमधला सांगत बातमीत शेअर केला होता. मात्र, आता हा लेख अपडेट करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक प्रसारमाध्यमांनी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्याचे वृत्त दिले आहे.


झी सलाम ने ही याच सामन्या दरम्यानचा व्हिडीओ सांगत हा व्हिडिओ ट्वीट केला होता.



रवी रंजन यांनीही हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

यासोबतच, इतरही अनेक युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे सत्य...?

गुगलवर या संदर्भात वर्ड सर्च केला असता, YouTube वर जानेवारी 2021 मध्ये अपलोड करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. 'डेली डेअरी न्यूज' या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ अपलोड केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नुकत्याच झालेल्या सामन्यातील कसा असू शकतो?


Full View

Scoop-Whoop ने 19 जानेवारी 2021 रोजी या व्हिडिओबद्दल एक आर्टिकल प्रकाशित केलं होतं. या आर्टिकलनुसार, हा व्हिडीओ भारत आणि ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर सिरीजचा आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील गब्बा स्टेडियममध्ये एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती भारताच्या समर्थनार्थ घोषणा देत होता. या लेखात काही ट्विट शेअर करण्यात आले आहेत. ज्यात हा व्हिडिओ दिसत आहे.



@CricFansWorld @BCCI @HCICanberra @anirbanganguly @UttamKu84140085 @virendersehwag @bhogleharsha some extraordinary love for India at display at the Gabba this year.😊😊 pic.twitter.com/lAoqTza3Cd



इतर काही युजर्सने देखील जानेवारी 2021 मध्ये हा व्हिडिओ ट्विट केला होता.


निष्कर्ष:

Boom Live ने देखील या व्हिडिओसंदर्भात एक फॅक्ट चेक केलं आहे. एकूणच, हा व्हिडिओ, किमान 10 महिने जुना असून, झी सलामने हा व्हिडीओ ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्याशी जोडत शेअर केला आहे.

या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केलं आहे.


Tags:    

Similar News