Fact Check : India Vs Pakistan मॅचनंतर पाकिस्तानी फॅन्सने फोडले टीव्ही?

India Vs Pakistan मॅचनंतर फॅन्सने खरंच टीव्ही फोडले का? काय आहे रिएलिटी? जाणून;

Update: 2022-08-31 01:30 GMT

28 ऑगस्ट 2022 रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आशिया चषक स्पर्धेत आमने सामने आले. यामध्ये भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. यानंतर माध्यमांनी पाकिस्तानच्या पराभवाशी संबंधीत असल्याचा दावा करत एक व्हिडीओ चालवला. या व्हिडीओमध्ये काही युवक रस्त्यावर टीव्हीची तोडफोड करत असल्याचे दिसून येत आहे. मीडियाने हा व्हिडीओ आशिया चषक 2022 या स्पर्धेतील भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर फॅन्सचा असल्याचा दावा केला आहे.

ABP न्यूजने 29 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता 'भारत की बात' या शोमध्ये हा व्हिडीओ चालवला. पाकिस्तानी फॅन्सने पराभवानंतर रागात टीव्हीची तोडफोड केल्याचा दावा केला आहे. (Archived)

Full View

टाइम्स नाऊ नवभारतने हा व्हिडीओ चालवताना हाच दावा केला आहे. (अर्काइव्ह)

Full View

इंडिया टीव्हीने सुध्दा हा व्हिडीओ आशिया कप 2022 मधील भारत पाकिस्तान या सामन्यानंतरचा असल्याचे म्हटले आहे. (अर्काइव्ह)

अशाच प्रकारे अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी व्हायरल व्हिडीओ सध्याचा असल्याचा दावा करत शेअर केला आहे.

काय आहे सत्य? (What is Reality)

या व्हिडीओची क्वालिटी पाहिल्यानंतर हा व्हिडीओ जुना असण्याची शक्यता बळावली. त्यामुळे व्हिडीओची सत्यता तपासण्यासाठी अल्ट न्यूजने काही कि-वर्डस सर्च केले. यामध्ये अल्ट न्यूजला 16 जून 2019 रोजी अपलोड झालेला एक व्हिडीओ मिळाला. त्यामुळे हे सिध्द होत आहे की, हा व्हिडीओ सध्याचा नसून जूना आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये टीव्हीची तोडफोड करणाऱ्या पाकिस्तानी फॅन्सच्या बाईटमध्ये तो म्हणतो की, अफगाणिस्तानविरुध्दही चांगले खेळले नाहीत. भारतासोबत तर सातत्याने आम्ही हारत आलो आहोत. आज बांग्लादेशसारख्या कमकूवत टीमकडूनही आम्ही हारलो आहोत. याचा आम्हाला अफसोस आहे. त्यामुळे पाकिस्तानी फॅन्सचा रागातील हा व्हिडीओ बांग्लादेशच्या विरोधात पराभव झाल्यानंतरचा आहे ना की भारताविरुध्द पराभव झाल्याचा.

Full View

या व्हिडीओबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी अल्ट न्यूजने फेसबुकवर सर्च केले. त्यामध्ये हा व्हिडीओ पाकिस्तानी न्यूज चॅनलने  केलेला 28 सप्टेंबर 2018 रोजीचा एक रिपोर्ट मिळाला. त्यामध्ये अँकर निवेदन करताना म्हणतो की, बांग्लादेश विरोधात मॅच हारल्यानंतर टीव्हीची तोडफोड करण्यात आली.

Full View

पाकिस्तानी न्यूज चॅनल समा टीव्हीने 27 सप्टेंबर 2018 रोजी हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केला होता.

Full View

26 सप्टेंबर 2018 रोजी बांग्लादेश आणि पाकिस्तान देश क्रिकेटच्या सामन्यात आमने-सामने आले होते. या सामन्यात बांग्लादेशने पाकचा 37 धावांनी पराभव केला होता.




 

निष्कर्ष (Reality Check)

वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता मीडिया चॅनल्सने बांग्लादेश विरुध्द पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर पाकिस्तानी फॅन्सने टीव्हीची तोडफोड केल्याचा व्हिडीओ सध्याचा असल्याचा दावा करत चालवला आहे. मात्र बांग्लादेशकडून क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी फॅन्सने रागात टीव्ही तोडले होते. तर हा व्हिडीओ चार वर्षांपुर्वीचा असून तो आशिया चषक 2022 मधील असल्याच्या दाव्यासह शेअर करण्यात येत आहे.

या संदर्भात Alt News ने फॅक्ट चेक केले आहे. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा. https://www.altnews.in/hindi/media-channels-broadcast-2018-video-of-pakistani-fans-breaking-tv-as-recent/

Tags:    

Similar News