सध्या सोशल मीडियावर अण्णा हजारे यांच्या कथित @Anna_Hazare_IND अकाउंटवरून एक ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये
RSS एक जातिवादी संघटन आहे. देशातील तरुण वर्गाची माथी भडकवन्याचं ज्ञान नागपुरच्या शाखेत दिलं जाते. कॉंग्रेस विरुद्ध आंदोलन करायला मला RSS चा पाठींबा होता. मला वाटलं भाजपा सत्तेत आल्यावर देश सुधारेल, पण देशाचं दुर्देव्य की मोदी सारखा आडाणी माणुस त्यांच्या नशिबी आला, आणि आज सरकारी संपत्ती विकुन देश चालवायची वेळ आले. मी समस्त भारत वासियांचा गुन्हेगार आहे. मला माफ करा.
या आशयाचं ट्वीट व्हायरल होतं आहे.
फेसबूकवर देखील अशाच प्रकारे अण्णा हजारे यांचा हा मेसेज व्हायरल केला जात आहे. Rajaram Tukaram Nalawade यांनी या संदर्भात 4 सप्टेंबर 2021 ला पोस्ट केली आहे. आत्तापर्यंत या पोस्टला 26 लोकांनी कमेंट केल्या आहेत. तसंच 24 लोकांनी हे पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे सत्य?
@Anna_Hazare_IND या ट्वीटर अकांउटवर अशा आशयाची कोणतीही पोस्ट आम्हाला आढळली नाही. मात्र, 3 सप्टेंबरला 9:51 ला एक पोस्ट या अकांउटवर पोस्ट करण्यात आली आहे. सदर पोस्ट हिंदी मध्ये असून त्यामध्ये
जब मैं सीएम उद्धव ठाकरे के दफ्तर में धरने के लिए परमिशन लेने गया तो मुझे बाहर प्रतीक्षा करने को कहा गया..
इस बीच "संजय राउत" 4 पुलिस वालों के साथ हाथ में डंडे लेकर 3 बार मेरे सामने से गुजरे तो हम वापस लौट गए।
इस तरह हमको डंडों से डराना लोकतंत्र की हत्या है।
असं हिंजी ट्वीट करण्यात आलं आहे.
जब मैं सीएम उद्धव ठाकरे के दफ्तर में धरने के लिए परमिशन लेने गया तो मुझे बाहर प्रतीक्षा करने को कहा गया..
— Anna Hazare (@Anna_Hazare_IND) September 3, 2021
इस बीच "संजय राउत" 4 पुलिस वालों के साथ हाथ में डंडे लेकर 3 बार मेरे सामने से गुजरे तो हम वापस लौट गए।
इस तरह हमको डंडों से डराना लोकतंत्र की हत्या है।
या पोस्टचा आणि व्हायरल झालेल्या पोस्टची वेळ एकच आहे. तसंच व्हायरल होणाऱ्या पोस्टची शब्द संख्या ही 280 पेक्षा अधिक आहे.
ट्वीटर वर कोणत्याही ट्वीटची शब्द संख्या 280 पेक्षा अधिक नसते. मात्र, या व्हायरल ट्वीटची शब्द संख्या 366 आहे. यावरून 3 सप्टेंबरच्या @Anna_Hazare_IND या ट्वीटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्वीट चा मजकूर हटवून या ठिकाणी
'RSS एक जातिवादी संघटन आहे. देशातील तरुण वर्गाची माथी भडकवन्याचं ज्ञान नागपुरच्या शाखेत दिलं जाते. कॉंग्रेस विरुद्ध आंदोलन करायला मला RSS चा पाठींबा होता. मला वाटलं भाजपा सत्तेत आल्यावर देश सुधारेल, पण देशाचं दुर्देव्य की मोदी सारखा आडाणी माणुस त्यांच्या नशिबी आला, आणि आज सरकारी संपत्ती विकुन देश चालवायची वेळ आले. मी समस्त भारत वासियांचा गुन्हेगार आहे. मला माफ करा'.
हा मजकूर पेस्ट करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे दोनही ट्वीट ची फॉन्ट साइज आणि फॉन्ट स्टाईल पाहता, ही बाब स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळं सदर पोस्ट ही फोटो शॉप करून व्हायरल करण्यात आल्याचं दिसून येतं.
@Anna_Hazare_IND अण्णा हजारे यांचं आहे का?
@Anna_Hazare_IND या ट्वीटर अकाउंट संदर्भात आम्ही अण्णा हजारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क केला असता, जनसंपर्क अधिकारी संजय पठाडे यांनी अण्णा हजारे यांचं कोणतंही अधिकृत ट्वीटर अकाउंट नसल्याची माहिती मॅक्समहाराष्ट्रला दिली.
ते म्हणाले अण्णा हजारे यांच्या नावाने अनेक अकाउंट सोशल मीडियावर आहेत. आम्ही अण्णा हजारे यांचं एक अकाउंट ट्वीटरकडे Verified करण्यासाठी पाठवलं होतं. मात्र, ट्वीटर ने सोशल मीडियावर अनेक अकाउंट असल्यानं अद्यापपर्यंत ते Verified केलेले नाही. आमचा प्रयत्न सुरू आहे. तसंच अण्णांच्या नावाने व्हायरल झालेली ही पोस्ट खोटी असून या संदर्भात आम्ही ट्वीटरकडे तक्रार नोंदवणार आहोत. अण्णा हजारे यांचं अधिकृत फेसबूक पेज आहे. त्यावर अण्णा आपली अधिकृत भूमिका मांडत असतात. ट्वीटरवर अण्णांचं कोणतंही अधिकृत अकाउंट नाही. अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांचे जनसंपर्क अधिकारी संजय पठाडे यांनी दिली आहे.
दरम्यान अण्णा हजारे यांच्या संदर्भात मध्यंतरी एका वृत्तपत्राने देखील खोटं वृत्त दिलं होतं. औरंगाबाद येथील 'लोकपत्र' या वर्तमानपत्रात 'नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात: अण्णा हजारे' या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, अण्णा हजारे यांनी अशा प्रकारचं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. हे वृत्त देणाऱ्या 'लोकपत्र' वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक रविंद्र विठ्ठलराव तहकिक आणि प्रकाशक अंकुशराव नानासाहेब कदम यांच्याविरुद्ध पारनेर येथे अण्णा हजारे यांच्या कार्यालयाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पठाडे यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संबंधीत वृत्तपत्राने माफी देखील असून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर अण्णा हजारे यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं होतं?
काय म्हटलं होतं प्रसिद्धी पत्रात?
औरंगाबाद येथील 'लोकपत्र' या वर्तमानपत्रात 'नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात : अण्णा हजारे' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली. बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेलेच नाही, ते माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध करण्यात आली असे वाटते. अधिक चौकशी करता असे निदर्शनास आले की, सदर बातमी फक्त औरंगाबाद येथील 'लोकपत्र' या एकमेव दैनिकात प्रसिद्ध झाली असून सदर दैनिकाचे औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक 'रविंद्र तहकिक' हे त्यास जबाबदार आहेत.
यापूर्वीही अनेकदा 'दैनिक लोकपत्र' मधून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या, लेख आलेले आहेत. अशीच एक खोटी बातमी छापल्याबद्द्ल आमचे वकिल श्याम असावा यांनी लोकपत्रचे रविंद्र तहकिक यांना 13 नोव्हेंबर 2019 रोजी कारवाईसंबंधी कायदेशीर नोटीस बजावली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. म्हणून त्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले व कारवाई करण्याचे टाळले होते. परंतू आता पुन्हा त्यांनी अशीच खोटी बातमी छापून शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
समाजात शिक्षकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. देशाचे भवितव्य असलेली नवीन पिढी घडविण्याचे काम शिक्षकच करीत असतात. त्यामुळे समाजात शिक्षकांविषयी आदराची भावना आहे. मीही शिक्षकांविषयी नेहमीच आदर व्यक्त केलेला आहे. परंतु काल लोकपत्रमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे मला खेद वाटला. तसेच संपूर्ण शिक्षक वर्गात संभ्रम निर्माण झाल्याचे सोशल मिडियावर दिसून आले. ही बाब समाजाच्या दृष्टीने चांगली नाही. मी नेहमी सांगत असतो की, दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करीत असतात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत असते.
वास्तविक, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेलेला आहे. त्यामुळे पत्रकारांनी व माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने वागले पाहिजे. पण या क्षेत्रातही काही अपप्रवृत्ती असल्याचे सदर बातमीवरून दिसून येते. त्यातूनच अशा खोट्या बातम्या पसरवल्या जातात. औरंगाबाद येथील लोकपत्र या वर्तमानपत्रातून यापूर्वी अनेक वेळा माझ्याबद्द्ल तसेच शिक्षकांबद्द्लही चुकीच्या बातम्या छापलेल्या निदर्शनास आलेल्या आहेत. परंतू समाजाने जागरुक राहून अशा प्रवृत्तींना थारा देऊ नये. समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील असा विचार करावा. शिक्षकी पेशा हा एक पवित्र पेशा आहे. शिक्षकांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवावे.
आमच्या वकिलांनी लोकपत्रच्या कार्यकारी संपादकांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच त्यांना संबंधित नोटीस बजावण्यात येईल व कारवाई सुरू करण्यात येईल.
कि. बा. तथा अण्णा हजारे
निष्कर्श
एकंदरीत अण्णा हजारे यांच्या नावाने @Anna_Hazare_IND असलेलं हे ट्वीटर अकाउंट हजारे यांचं अधिकृत अकाउंट नाही. तसंच अण्णा हजारे यांच्या नावाने व्हायरल होणारा हा मेसेज फोटोशॉप केल्याचं स्पष्ट होतं. तसंच अण्णा हजारे यांचे कार्यालयाने अशा प्रकारे खोटे वृत्त देणाऱ्याच्या विरो