Fact Check: अफगाणिस्तानमध्ये विमानावर बसून चालेल्या लोकांचा हा व्हिडीओ खरा आहे का?

Update: 2021-08-19 08:28 GMT

सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक माणूस विमानाच्या पंखांवर झोपलेला दिसत आहे. दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर लोक देशातून बाहेर पडण्यासाठी असे मार्ग अवलंबत असल्याचा दावा या व्हिडीओवरून केला जात आहे. फेसबुक पेज 'गुलिस्तान न्यूज चॅनेल' यांनी हा व्हिडिओ याचं दाव्यासह शेअर केला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 6 हजाराहून जास्त लोकांनी पाहिलं आहे.



     Full View

 ट्विटर हँडल @kashmirAdolph ने सुद्धा हा व्हिडिओ याच दाव्यासह ट्विट केला आहे. या व्हिडिओला सुद्धा 25 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.




   फेसबूक वरही हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

 काय आहे सत्य...

 व्हिडिओच्या फ्रेमचं रिव्हर्स इमेज सर्च केला असता, आम्हाला हा व्हिडिओ २०२० साली अनेक सोशल मीडिया हँडल्स आणि यूट्यूब चॅनेलद्वारे पोस्ट केलेला आढळला. दरम्यान, हा व्हिडिओ सर्वात अगोदर १८ ऑगस्ट २०२० साली अपलोड करण्यात आला होता. एका ट्विटर यूजरने सुद्धा हा व्हिडिओ ट्विट केला होता. ट्विट करण्यात आलेला व्हिडिओ हा खरं तर एक टिक - टॉक व्हिडिओ आहे. तर या टिक - टॉक व्हिडिओच्या यूजरचे नाव 'theghostofinternet' असं आहे.




 



या व्यतिरिक्त, आम्हाला आणखी एक असाच व्हिडिओ सापडला. ज्यामध्ये एक व्यक्ती विमानाच्या पंखांवर बसलेला आहे. दरम्यान, दोनही व्हिडिओचा बॅकग्राउंड सारखाच असल्याचं दिसून आलं. खाली दिलेल्या फोटोवरून हे स्पष्ट दिसून येत.




 




 



दरम्यान, व्हायरल होणारे व्हिडिओ अनेक मिम्स आणि फनी व्हिडिओजच्या अकाउंट्स वरून पोस्ट करण्यात आला होता. इंटरनेटवर सारखाच बॅकग्राऊंड असलेल्या अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. मात्र, यूट्यूबवर 17 डिसेंबर 2020 रोजीचा एक व्हिडिओ आढळला. ज्यामध्ये सारखाच बॅकग्राऊंड असलेल्या अनेक वेगवेगळ्या व्हिडिओ पाहायला मिळाल्या. या यूट्यूब चॅनेलच्या अबाउट सेक्शनमध्ये असं लिहिलं आहे की, हे चॅनेल सामान्य जीवनाचे व्हिडीओ फोटोशॉप करतं आणि ते  त्याच्या व्लॉगवर शेअर करतं.





 Full View



 या व्हिडिओच्या डिस्क्रिपशनमध्ये 'Huy Xuân Mai' या फेसबुक यूजरच्या प्रोफाइलची लिंक सुद्धा दिली आहे. दरम्यान, या फेसबूक यूजरने 17 ऑगस्ट 2020 रोजी व्हायरल होणारा व्हिडिओ पोस्ट केल्याचं आढळून आलं. त्याच्या फेसबूक टाइमलाईनवर अशाप्रकारचे अनेक व्हिडिओज पाहायला मिळाले. तसेच या फेसबुक यूजरनुसार, तो एका फोटोशॉप पेज 'Photoshop Có Tâm & Troller' चा एडमिन सुद्धा आहे. या फेसबुक पेजवर सुद्धा याप्रकारचे अनेक व्हिडिओज आहेत.


 निष्कर्श

 एकूणच, शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडिओचा अफगाणिस्तानशी काहीही संबंध नाही तसेच २०२० सालचा एडिट केलेला व्हिडिओ आताच सांगत शेअर केला जात आहे. मात्र, अशी अनेक दृश्य आहेत ज्यात अफगाणिस्तानातील लोक विमानाच्या इंजिनवर चढताना दिसत आहेत. रिपोर्टनुसार, आतापर्यंत उड्डाण केल्यानंतर विमानातून पडून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

 या संदर्भात Altnews ने फॅक्ट चेक केलं आहे. 

Tags:    

Similar News