मदरश्यांवर बंदी घाला, APJ Abdul Kalam यांचं वादग्रस्त विधान व्हायरल, काय आहे सत्य?

Update: 2021-09-09 14:51 GMT

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोसह एक कथित विधान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये, "मुस्लिम जन्मतःच दहशतवादी नसतात. त्यांना मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते, त्यानुसार ते हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन, ज्यू आणि इतर बिगर मुस्लिमांची निवडकपणे हत्या करतात. दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतात चालणाऱ्या हजारो मदरशांवर बंदी घालणे अत्यंत आवश्यक आहे." असा दावा या संदेशातून केला आहे. अब्दुल कलाम यांच्या फोटोसह हे विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, ट्विटरवर विनोद तटीवल यांनी या दाव्याबद्दल पडताळणी करण्यात यावी यासाठी ट्विट देखील केलं आहे.



काय आहे सत्य...

दरम्यान, सोशल मीडियावर अनेक वर्षांपासून डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या फोटोसह हे विधान व्हायरल होत आहे. तसेच 2 वर्षांपूर्वी 'शेअर चॅट' वर अब्दुल कलाम यांच्या दुसऱ्या एका फोटोसोबत हे विधान शेअर करण्यात आलं होतं. मात्र, 2014 च्या ब्लॉग पोस्टमध्ये या कथित विधानाचे सर्वात जुने उदाहरण सापडले. हा ब्लॉग संजय तिवारी चालवतात. जे उजाला न्यूज नेटवर्कचे संस्थापक आहेत.

दरम्यान, त्यांचे ट्विटर हँडल पाहिले असता, ते पीएम मोदींचे समर्थक आहेत तसेच अरविंद केजरीवाल यांच्यासंदर्भात त्यांनी अपशब्दांचा वापर केल्याचं देखील दिसून आलं.

आम्ही या विधानाशी संबंधित बातम्या शोधण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला अशी कोणतीही बातमी सापडली नाही. अब्दुल कलाम यांनी असं कोणतं वादग्रस्त विधान केलं असेल आणि माध्यमांनी त्याबद्दल बातमी केली नसेल. असं होणं केवळ अशक्य आहे.

कुटुंबाने या विधानाला बनावट असल्याचं सांगितलं...

दरम्यान, या फोटोची सत्यता पडताळण्यासाठी ए.पी.जे.एम. जे शेख सलीम यांच्याशी संपर्क साधला. सलीम हे अब्दुल कलाम यांचे पुतणे तसेच अब्दुल कलाम इंटरनेशनल फ़ाउंडेशन (AKIF) चे मॅनेजिंग ट्रस्टी देखील आहेत. ते म्हणाले की,

"एपीजे अब्दुल कलाम यांनी असे कोणतेही विधान केले नाही. त्यांनी कधीही कोणत्याही धर्माशी संबंधित कोणतीही टिप्पणी केली नाही."

निष्कर्श

एकंदरीत, वर्षानुवर्षांपासून, एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने सोशल मीडियावर एक बनावट विधान शेअर केलं जात आहे.

या संदर्भात AltNews ने फॅक्ट चेक केलं आहे.

Tags:    

Similar News