रोम-अमृतसर विमानातील १२५ जणांना कोरोना, ते विमान एअर इंडियाचे होते का?

Update: 2022-01-07 05:20 GMT

मुंबई- गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉननेही देशातील नागरीकांची धास्ती वाढवली आहे. त्यातच एअर इंडियाच्या विमानाने इटलीतील रोम येथून अमृतसर येथे आलेल्या विमानात कोरोनाचे १२५ रुग्ण आढळल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते, यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पण एअर इंडियाने याबाबत काही माध्यमांनी दिलेले वृत्त फेटाळले आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दरम्यान 6 जानेवारी रोजी इटलीतून अमृतसर येथे आलेल्या विमानातील 179 प्रवाशांपैकी 125 कोरोना संक्रमित असल्याची बातमी देशातील प्रमुख वाहिन्यांनी प्रसारित केली. मात्र हे विमान एअर इंडियाचे असल्याचे वृत्त एअर इंडियाने फेटाळून लावले आहे.

अग्निबाण या हिंदी वेब पोर्टलने वृत्तात म्हटले आहे की, इटली के रोम से अमृतसर आई Air India की फ्लाईट, 182 में से 100 यात्री निकले पॉजिटिव्ह


 



नवभारत या वेब पोर्टलने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, एअर इंडिया कोरोना ब्लास्ट : अमृतसर एअर पोर्टवर कोरोनाचा ब्लास, इटलीतून आलेले 125 प्रवासी कोरोना संक्रमित असल्याचे म्हटले आहे.




 


इटलीतील रोममधून अमृतसरला आलेल्या एअर इंडियाच्या विमानातून कोरोनाचा स्फोट झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर एअर इंडियाने ट्वीट करून सांगितले की, रोममधून भारतात येण्यासाठी एअर इंडियाची कोणतीही विमान सेवा सध्या सुरू नाही. त्यामुळे देशातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनी एअर इंडियाच्या विमानातून कोरोनाचा विस्फोट झाल्याचे दिलेले वृत्त खोटे आहे.

तर इटलीतील रोम येथून अमृतसर येथे आलेले चार्टर्ड विमान एअर इंडियाचे नसून पोर्तुगीज कंपनीचे होते. त्या विमानात 179 प्रवाशांपैकी 125 कोरोना संक्रमित असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर अमृतसर येथे उपचार सुरू आहेत, अशी माहिती अमृतसर जिल्हा रुग्णालयाने दिली आहे.

Similar News