मायबाप सरकार गरीबाघरचा दिवा मालवू नका..
पुन्हा लॉकडाऊन वीजग्राहकांच्या मुळावर? वीजतज्ञ प्रताप होगाडे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रावर खास चर्चा;
कोरोनाच्या संकटात सर्वात भरडला गेला तो वीज ग्राहक. सुरवातीला अव्वाच्या सव्वा बिलं. त्यानंतर सरकारची वीजबील माफीची फसवी घोषणा. आता पदरमोड करुन मंगळसुत्र विकून कर्ज काढून लोकं वीज बिल भरत असताना दुसऱ्या लॉकडाऊनचं महासंकट येऊन ठेपलयं. वीज कंपन्या अडचणीत आहेत या फसव्या दाव्याची पोलखोल करुन सर्वसामान्यासाठी आता तिजोरीत हात घालण्याची गरज आहे, गरीबाघरचा दिवा मालवून नका असं सांगताहेत वीजतज्ञ प्रताप होगाडे मॅक्स महाराष्ट्रचे सिनीअर प्रिन्सिपल कॉरोस्पॉंडन्ट विजय गायकवाड यांनी घेतलेल्या मॅक्स महाराष्ट्रच्या विशेष चर्चेत....