नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजवली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळे या भागातील माती बंधारे फुटून शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी शिरले. याममध्ये जवळपास 40 ते 50 एकरातील पिकांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गोंडजेवली येथे ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीची पाहणी मंडळ अधिकारी एन. बी. सानप आणि तलाठी ए. के. डुकरे यांनी केली. यामध्ये प्रत्यक्षपणे खरडलेल्या जमिनीची व नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यात आली. आता या नुकसानीची पाहणी होईल, मग त्यानंतर पंचनामा होईल पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे का आणि एवढेच नाही तर पुढील पेरणीसाठी शेतकऱ्यांना सरकार मदत करणार आहे का हाच खरा प्रश्न आहे.