८लाख ४८ हजार १८६ करोड रुपये इतक्या कर्जाचं काय झालं..?एमआयएमचे खा.इम्तियाज जलील
एखाद्याला कर्ज दिल्यानंतर बॅंका त्या व्यक्तींच्या नावाची नोटीस देऊन त्याच्या मालमत्ता जप्त केले जाते परंतु गेल्या चार वर्षात केंद्र सरकारच्या संमतीनुसार ८ लाख ४८ हजार १८६ करोड रुपये इतके कर्ज दिले गेले त्याचे काय झाले .? गरिबाला आणि उच्चभ्रूश्रीमंताला वेगळा न्याय का .? असा सवाल एमआयएम पक्षाचे औरंगाबाद लोकसभेचे खासदार इम्तियाज जलील यांनी देशाच्या कायदामंत्र्याला उद्देशून लोकसभेत हा सवाल उपस्थित केला आहे..
१९३४ च्या ऍक्टनुसार देशातल्या सर्वसामान्यांसाठी तरतूद असणाऱ्या पैशांचे काय झाले या प्रश्नाचे उत्तर मंत्री आरबीआयकडून का घेत नाहीत..? असे प्रश्न उपस्थित करीत जलील यांनी अपयशी झालेल्या उज्वला गॅस योजना, पेन्शन योजना अशा शासनाच्या योजनेबाबत प्रश्न उपस्थित केले.