Ajit Pawar On Narayan Rane शिवसेना फोडणारे सगळे पडले, नारायण राणेंना तर एका बाईनं पाडलं- अजित पवार

कसबा आणि चिंचवड इथो पोट निवडणूका होत आहेत मात्र सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये शाब्दीक खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजा अजित पवार यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नारायण राणे यांच्यावर टिका केली.;

Update: 2023-02-24 13:33 GMT

कसबा आणि चिंचवड पोट निवडणूच्या रणधुमाळीची आज सांगता झाली. मात्र यावेळी अनेकांनी रोड-शो केले तर अनेकांनी एकमेकांची खिल्ली उडवली. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली ४० आमदारांनी बंड केल्यानंतर जे काही आरोप-प्रत्यारोप झाले त्यात राष्ट्रवादीचेही नाव समोर आले होते. ठाकरे आणि पवारांची जी जवळीक निर्माण झाली. त्यामुळे शिवसेना संपत चाललीय असं म्हणत आमदांनी बंडांचे हत्यार उपसले. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण राज्याचे प्रमुख झाल्यानंतर ज्या राष्ट्रवादीवर बंडानंतर आरोप केले, त्याच राष्ट्रवादीने आता घेरेबंदी करण्यास सुरवात केली आहे.

आज कसब्यातील प्रचारसभेत अजित पवार यांनी शिवसेना फोडणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत, असा टोला सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लगावला. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अजित पवारांनी खिल्ली उडवली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणे यांना पाडले, असे अजित पवार यावेळी म्हणाले. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसचे टीका टिप्पणीला सुद्धा सुरवात झाली आहे. 

Tags:    

Similar News