इंजिनिअरिंगचे शिक्षण आता मराठी भाषेमध्येही घेता येणार

Update: 2021-07-29 15:16 GMT

नवी दिल्ली  :  गेल्या वर्षी 29 जुलै रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात नवीन राष्ट्रीय धोरण जाहीर केले होते या धोरणाला एक वर्ष पुर्ण झाल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नवे शिक्षण धोरण लागू केल्यापासून काय घडलं याची माहिती दिली. देशातील आठ राज्यात 14 महाविद्यालयात 5 भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण देण्यात येणार असल्याचं सांगितलं त्यांनी यावेळी सांगितले. सोबतच देशातील 8 राज्यामध्ये 14 अभियांत्रिकी महाविद्यालयात आता मातृभाषेत अभ्यासक्रम सुरु होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तर 5 प्रादेशिक भाषांमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण सुरु होणार आहे. ज्यामध्ये हिंदी, तेलुगू, मराठी, तामिळ, आणि बांगला भाषेचा समावेश असणार आहे.



सोबतच देशात 11 भाषांमध्ये अभ्यासक्रम भाषांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. गरीब विद्यार्थ्यांना, मध्यम वर्गातील आणि दलित, आदिवासी वर्गातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्या वर्गातील विद्यार्थ्यांना भाषेच्या अडचणीला सामोरं जावं लागत होते. अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
Tags:    

Similar News