Max Maharashtra Impact : अखेर ५९७ कंत्राटी आरोग्य सेवकांना तात्पुरती नियुक्ती

Update: 2021-09-16 07:58 GMT

कोरोना काळात जीवाची बाजी लावून आरोग्य सेवा बजावणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मॅक्स महाराष्ट्रने यासंदर्भात कंत्राटी कामगारांच्या व्यथा मांडणारा ग्राऊंड रिपोर्ट सादर केला होता. यानंतर सरकारने या बीडमधील २९ आणि राज्यभरातील ५९७ आरोग्य सेविकांना पुनर्नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या दोन महिन्यांकरीता या आरोग्य सेविकांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. यानंतर या सर्व आरोग्य सेविका कामावर हजर झाल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या 29 आरोग्य सेविकांना कार्यमुक्त करण्यात आले होते. राज्य सरकारने 27 ऑगस्ट 2021 रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. यानंतर मॅक्स महाराष्ट्रने 4 सप्टेंबरला या कंत्राटी कामगारांची व्यथा मांडणारा रिपोर्ट सादर केला होता. या वृत्ताची दखल घेत 14 सप्टेंबर रोजी 29 कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली आहे.

१०-१५ वर्ष काम करुनही आम्हाला कामावरुन कमी केले गेले, आम्ही केलेल्या सेवेचा विचार केला नाही, आम्ही घर कसे चालवायचे असा सवाल या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विचारला होता. आता तात्पुरती नियुक्ती देण्यात आली असली तरी १५ वर्षांपेक्षा जास्त काम करणाऱ्या आरोग्य सेवकांना कायम स्वरुपी सेवेत घेण्याची मागणी या आरोग्य सेवकांनी केली आहे.

Tags:    

Similar News