आज १२ जून जागतिक बाल मजुरीविरोधी दिन हा दिवस आनंदाचा नाही तर दु:खाचा आहे. कारण जगातली लाखो कोटींच्या संख्येने मुलं बालमजुरीकडे ढकलली गेली आहे. त्यामुळे त्यांचं जीवन अंधकार झालेलं आहे. त्यामुळे या दिनाच्या शुभेच्छा न देता आजच्या दिवशी संकल्प करूया की, आपल्या परिसरातील एकही मुलं बालमजूर असणार नाही.
असा प्रयत्न तुम्ही आम्ही समाजातील नागरिक म्हणून केला पाहिजे असे प्रा. हेरंब कुलकर्णी यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं.
आयएलओ जागतिक कामगार संघटनेने बालकामगारांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोविडमुळे बालकामगारांची संख्या कितीने वाढली? आणि कोव्हिडची अशीच परिस्थिती राहिली तर बालमजुरी किती पट्टीने वाढेल? तसेच शालाबाह्य झालेल्या मुलांचं भविष्य कसं असणार? बालमजुरी रोखण्यासाठी सरकार काय विचार करतंय यासंदर्भात हेरंब कुलकर्णी यांनी जागतिक पातळीचे संदर्भ घेत केलेले विश्लेषण नक्की पाहा....