महिलांना लोकल प्रवासाची परवानगी, नवरात्रीचा मुहूर्त टळणार?
Women will be allowed to travel locally, Navratri will be avoided?;
राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत आता महिलांना लोकलची दारं खुली करण्याचा निर्णय घेतलाय. नवरात्राच्या मुहूर्तावर महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारे राज्य सरकारचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. पण मध्य रेल्वेने हे पत्र अधिकृतपणे मिळालेले नाही तर सोशल मीडियावरुन मिळाल्याचे सांगितले आहे. तसेच या पत्राची सत्यता तपासून राज्य सरकारच्या या विनंतीवर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांनी दिलेली आहे.
या पत्रानुसार घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने मोठी घोषणा केल्याचे म्हटले आहे. . मुंबईच्या लोकलमधून आता सर्व महिलांना प्रवास करता येणार आहे. शनिवारपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवापासून महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देऊन राज्य सरकारने महिलांना गोड बातमी दिलीय. कोविड १९ चा संसर्ग कमी झालेला नाहीये, त्यामुळे लोकलमध्ये गर्दी होऊ नये या दृष्टीने महिलांना लोकल प्रवास सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर शेवटची लोकल असे पर्यंत प्रवास करण्याची परवानगी महिलांना राज्य सरकारने दिलीय, असे या पत्रात म्हटले आहे.