महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? , आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले...

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न कालपासून वारंवार विचारण्यात येत आहे. मात्र, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. सुरक्षेच्या बाबतीत सरकार कोणतीही कमी पडून देणार नाही असे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.;

Update: 2021-12-31 02:35 GMT

मुंबई // महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न कालपासून वारंवार विचारण्यात येत आहे. मात्र, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. सुरक्षेच्या बाबतीत सरकार कोणतीही कमी पडून देणार नाही असे स्पष्ट संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत.

सोबतच ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. कोविड टास्क फोर्ससोबत याबाबत महत्त्वाची चर्चा झाली. रुग्णसंख्या वाढणे चिंतेची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेऊ शकतात. काल मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत साडेतीन तास बैठक घेत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला.

पॉझिटिव्ह रेटमध्येही लक्षणीय वाढ झाल्याचं मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. गुरुवारी राज्यात कोविडचे 4000 हून अधिक नवीन रुग्ण आढळलेत, ही चिंतेची बाब आहे. सध्या पॉझिटिव्ह रेट सुमारे 8.48 आहे. कम्युनिटी लेव्हलवर पसार झाला आहे का?, याचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत कम्युनिटी स्प्रेडवर काय परिस्थिती आहे हे स्पष्ट होईल. कोविडचा डबलिंग रेट 2 दिवस आहे, याचा अर्थ आकडे 2 दिवसात दुप्पट होत आहेत. विशेषत: मुंबई, ठाणे, नाशिक, रायगड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली येथे जलद रुग्ण आढळून आलेत.

Tags:    

Similar News