ठाणे जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र येणार? जितेंद्र आव्हाड यांची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस वाद विकोपाला गेला होता. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. त्यापार्श्वभुमीवर भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Update: 2022-02-19 13:53 GMT

ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणूका जवळ येत असतानाच राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली होती. त्यातच गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यात शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस वाद रंगला होता. तर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यापार्श्वभुमीवर ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणूकीसाठी महाविकास आघाडी करण्याचा निर्णय सर्वच शहराध्यक्षाच्या बैठकीत झाला असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली. संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले आणि जिल्ह्यात पालिका निवडणूकीसाठी एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरवले आहे. तसेच समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. त्यामुळे भाजप हा महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी असल्याने भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे, असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.

सह्याद्रीनेच छातीचा कोट केलाय

यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, दिल्लीने महाराष्ट्रवर अन्याय केला आहे. हे संजय राऊत यांचे मत खरे आहे. दिल्लीने महाराष्ट्रावर अनेक वेळा अन्याय केला आहे. मात्र सह्याद्री कधीच हिमालयापुढे झुकला नाही. पण इतिहास बोलका आहे, त्यामुळे हे स्पष्ट होते की, जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत आला. त्यावेळी सह्याद्रीने छातीचा कोट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र द्वेषभावना मनात बाळगणार नाही.

आव्हाड पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपुर्वी रेल्वे रुळांलगतच्या झोपडीधारकांच्या पुन:र्वसनाचा प्रश्न निर्माण झाला. तर याबाबत रेल्वे मंत्री वैष्णवी आणि रेल्वेराज्यमंत्री दानवे हे दोघेही सकारात्मक आहेत. पाचव्या-सहाव्या रेल्वेरुळांमुळे विकास होत आहे. पण, हा विकास साधत असताना तुम्ही गोरगरीबांच्या घरावर वरंवटा फिरवू शकत नाहीत. मी मेलो तरी चालेल; पण, असा वरंवटा फिरवू देणार नाही, अशी भुमिका आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच उच्च न्यायालयाने कळव्यातील झोपड्या पाडण्याचे आदेश दिले. त्यावेळी मी 25 हजार लोकांना घेऊन मी रेल्वे अडविली होती, अशी आठवण यावेळी आव्हाड यांनी सांगितली.

Tags:    

Similar News