पुण्यात एकतर्फी निवडणूक होऊ देणार नाही - वसंत मोरे

Update: 2024-03-21 09:57 GMT

माजी मनसे नेते वसंत मोरे हे गेली अनेक वर्षे पुणे शहरात काम करत असून यावर्षी लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे. ते निवडणूक लढवणार असल्याने यावेळी एकतर्फी निवडणूक होणार नाही, असं ते म्हणाले.मनसे राज ठाकरे, अमित ठाकरे यांच्याबाबत त्यांनी कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट केली नाही किंवा काही बोललो नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, त्यांनी कुणाला डिवचले नाही, पक्षातून बाहेर पडून पक्षाच्या धोरणापासून ते आता बाजूला झाले आहेत. म्हणून आता एकला चलो रे च्या भूमिकेत असल्याचं मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं आहे.

मोरे पुढे बोलताना म्हणाले की, मी निवडणूकीच्या रिंगणात येत असताना कोणी-कोणी माझ्या वाटेत काटे टाकले, हे सर्व काटे योग्यवेळी मी बाहेर काढणार. एखादा सर्वसामान्य कुटूंबातील कार्यकर्ता स्वाभिमानाने घरातून बाहेर पडून शहराचा विकास साधण्याचे बघतो, त्यावेळी माशी नेमकी कुठे शिंकते? हे पुणेकरांना जाहीर सभेत सांगणार आहे. वेगळी भूमिका घेतल्यावर किती लोक आडवे येतात, याचा मला अनुभव असून वेळप्रसंगी अपक्ष देखील निवडणूक लढण्याची माझी तयारी असून पुण्यात मी एकतर्फी निवडणूक होऊ देणार नाही असं वसंत मोरे यावेळी म्हणाले.

Tags:    

Similar News