नितीश कुमार आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार ?
आरजेडी आणि जेडीयूमधील आघाडीत बिघाडी झाल्याच निश्चित झाल आहे. आज संध्याकाळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती प्रसारित होत आहे.;
आरजेडी आणि जेडीयूमधील आघाडीत बिघाडी झाल्याच निश्चित झाल आहे. आज संध्याकाळी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती प्रसारित होत आहे.
चिराग पासवान यांच्याशी चर्चा झाली आहे
इंडिया आघाडीत बिघाडी झाली आहे. पंजाब मुख्यमंत्री भगवंत मान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशात इंडिया आघाडीचे महत्वाचे पक्ष इंडिया आघाडीला सोडून जातांना दिसत आहेत. या परिस्थितित राजकीय पक्षांमध्ये बैठकांचा सत्र सुरू झालंय. बिहार राजकारणात मोठा भूकंप आला असून, येत्या काही तासात बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून कोणत्या नव्या आघाडीची सरकार बनते हे समजणार आहे. नितीश कुमार आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेबाबत चिराग पासवान यांच्याशी चर्चा झाली आहे. लोजपच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी चिराग यांना दिले आहेत. एनडीएचा भाग असल्याने आम्ही लोजपचे हित जपणार असल्याचं शाह म्हणालेत. दरम्यान अमित शाह आणि चिराग पासवान यांच्या बैठकीनंतर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
बैठकीत समहत झाल्यानंतर भाजपकडून पाठिंब्याच पत्र तयार केलं जाईल
सर्व देशाच लक्ष आजच्या नितीश कुमार यांच्या राजीनाम्याकडे लागलेल आहे. आज विविध विषयावर जेपी नड्डा आणि अमित शाह यांच्यात चर्चा झाली. हम यापक्षाने अनेक बाबींची समस्या त्यांच्यासमोर मांडली. साधरण ३० मिनिटे हम पक्षासोबत चर्चा झाली. त्याच दरम्यान आरजेडी येत्या काही तासांत नितीश सरकारचा पाठिंबा काढून घेणार आहे. पाठिंबा काढून घेतल्याचे पत्र राजभवनाला पाठवले जाईल. यानंतर सरकार स्थापनेचा दावाही करतील असं सांगितलं जात आहे. येत्या काही तासात बिहारमधील राजकीय चित्र स्पष्ट होणार असून कोणत्या नव्या आघाडीची सरकार बनते हे समजणार आहे. नितीश कुमार आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आरजेडी आणि भाजप आप-आपल्या नेत्यांसोबत बैठक घेत आहे. भाजप खासदार आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, केंद्रीय मंत्री नित्यानंद राय, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हे पटणामध्ये दाखल झाले असून, त्यांची बैठक चालू आहे. ही बैठकीत नितीश कुमार यांना पाठिंबा द्यायचा का नाही हे ठरवलं जाणार आहे. या बैठकीत समहत झाल्यानंतर भाजपकडून पाठिंब्याच पत्र तयार केलं जाईल. ते पत्र आजच राज भवनकडे पाठवलं जाणार आहे