राज्यपाल विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष पेटणार?

राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण थांबवले. मात्र आता राज्यपाल विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.

Update: 2022-03-04 01:51 GMT

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला गुरुवारी सुरुवात झाली. मात्र अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले अभिभाषण रोखले. त्यानंतर राज्यपाल तडक निघून गेले. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यपालांनी केलेल्या कृतीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यपाल विरुध्द महाविकास आघाडी सरकार संघर्ष रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावेळी झालेल्या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले अभिभाषण रोखले आणि राज्यपाल थेट निघून गेले. या कृतीचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निषेध नोंदवण्यात आला. तसेच सभागृहातील गोंधळाचे कारण पुढे करून राज्यपालांनी अभिभाषण अर्धवट सोडून व राष्ट्रगीतासाठीही न थांबण्याची घेतलेली भुमिका ही निषेधार्ह आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कृतीचा राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला.

तसेच राज्य सरकारच्या वतीने राज्यपालांच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातच 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्या, सहकार कायद्यातील दुरुस्त्या परत पाठविणे, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा पत्रप्रपंच यामुळे वाद पेटलेला असतानाच आता राष्ट्रपतींकडे राज्यपालांच्या कृतीबद्दल नाराजीपत्र पाठविण्यामुळे राज्यपाल विरुध्द महाविकास आघाडी सरकार वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत. त्यापार्श्वभुमीवर 9 मार्चला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची योजना आहे. मात्र विधानसभा नियमातील 6(1) कलमांतर्गत अध्यक्षपदाच्या निवडणूकीची तारीख निश्चित करण्याचा अधिकार राज्यपालांकडे असतो. मात्र या नियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र हा बदल बेकायदेशीर असल्याचे मत व्यक्त करत राज्यपालांनी प्रस्ताव परत पाठवला होता. त्यामुळे आता ऐन विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज्यपाल विरुध्द राज्य सरकार संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags:    

Similar News