शिवसेना कुणाची? अब जनता न्याय करेगी....

शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची ? हा प्रश्न सर्व समान्यांपासून राजकीय विश्लेषका पर्यन्त सर्वांना पडलेला होता. याच उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आखेर काल दिल आहे. शिवसेनेच्या संदर्भात रखडलेला निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालाने ठाकरे गटात असंतोषाची लाट आली आहे, तर शिंदे गट या निकालाचे स्वागत करत आहे, जल्लोषाचा गुलाल उधळत आहे.;

Update: 2024-01-11 13:30 GMT

शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेंची ? हा प्रश्न सर्व समान्यांपासून राजकीय विश्लेषका पर्यन्त सर्वांना पडलेला होता. याच उत्तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आखेर काल दिल आहे. शिवसेनेच्या संदर्भात रखडलेला निकाल जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. या निकालाने ठाकरे गटात असंतोषाची लाट आली आहे, तर शिंदे गट या निकालाचे स्वागत करत आहे, जल्लोषाचा गुलाल उधळत आहे.

भरत गोगावले यांची व्हीप मान्य; शिवसेना शिंदेंची

21 जून 2022 ला शिवसेनेमध्ये फूट पडली. त्यामुळे त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्यामुळेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. सुनील प्रभूंचा व्हीपच लागू होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिकाकर्त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही, असं नार्वेकरांनी म्हटलं बीबीसी मराठीला सांगितलं. बैठकीला गैरहजर राहणं हे पक्षातून हकालपट्टीचं कारण होऊ शकत नसल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. या निकालामुळे एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांना दिलासा मिळाला आहे.

आमदारांना दिलासा मिळाला असला तरी पात्र-अपात्रेच्या या घोड दौड मध्ये दोन्ही गटाचे आमदार पात्र असूच शकत नाहीत. कोणताही एकच पक्ष असू शकतो एकाच पक्षात दोन पक्ष कसे ? असे अनेकानेक प्रश्न माध्यमातून पुढे येत आहेत. हा निकाल लोकशाही बळकट करण्यासाठीचा नसून लोकशाही अंतासाठीचा आसल्याची टीका महाविकास आघाडी च्या नेत्यांकडून होत आहे. तर हा संविधान आणि लोकशाही चा विजय आसल्याच्या प्रतिक्रिया शिंदेंच्या शिवसेना नेत्यांकडून येत आहेत.

दिवसा ढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या

सर्वच राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक आणि सर्व सामान्य मतदार ज्या निकालाची वाट पाहत होता तो निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याच स्पष्ट होताच ठिकठिकाणी राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरून निकालाचा निषेध नोंदवत आहेत. नार्वेकर यांचा निकाल म्हणजे शिंदे-फडणवीस यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट आसल्याच म्हंटल जात आहे. "या निकालाचा बदला जनता घेईल" उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेला आशी भावनिक साद घातली आहे. तर

ठाण्यात आणि कळव्यात एक पोस्टर झळकेले आहे. पोस्टरवर लिहिले आहे की 'आज दिवसा ढवळ्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली, अन् लोकांनी ती उघड्या डोळ्यांनी बघितली अब न्याय जनता करेगी'; या वाक्याच्या खालीच महाविकास आघाडी असेही या पोस्टरवर लिहिले गेले आहे. पण खऱ्याअर्थाने शिवसेना कोणाची हे येणाऱ्या कळात जनताच ठरवेल.

Tags:    

Similar News