मतदारांचा कौल मतपेटीत बंद, उत्तराखंडमध्ये 62.5, गोव्यात 78.94 तर उत्तरप्रदेशात साठ टक्यांवर मतदान

गोवा, उत्तराखंड येथे एकाच टप्प्यात तर उत्तरप्रदेशात झालेल्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान पुर्ण. मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे.

Update: 2022-02-15 01:45 GMT

पाचपैकी गोवा, उत्तराखंड राज्यात संपुर्ण तर उत्तरप्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यामुळे मतदारांचा कौल मतपेटीत बंद झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये 62.5 टक्के, गोव्यात 78.94 टक्के आणि उत्तरप्रदेशातील दुसऱ्या टप्प्यात 60 टक्क्याच्यावर मतदान पार पडले. त्यामुळे मतदारांचा आशिर्वाद कोणाला मिळणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

सुरूवातीला देशातील पाच राज्यांपैकी उत्तरप्रदेश, गोवा आणि पंजाब राज्यातील निवडणूकांकडे देशाचे लक्ष लागले होते. तर या तीनही राज्यातील निवडणूक आरोप प्रत्यारोपांनी गाजली होती. मात्र आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी उत्तराखंडमध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने उत्तराखंड निवडणूकही चर्चेत आली. त्यापैकी उत्तराखंड आणि गोव्यात संपुर्ण मतदान पार पडले आहे. तर उत्तरप्रदेशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. मात्र या तीनही राज्यात भाजपची सत्ता असल्याने सत्ता राखण्याचे भाजपसमोर आव्हान असणार आहे.

विधानसभा निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तरप्रदेशातील 55, उत्तराखंडमधील 70 तर गोव्यातील 40 जागांसाठी मतदान झाले. तर या तीनही राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता राखण्याचे भाजपसमोर आव्हान असणार आहे. तर सत्ता खेचून आणण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे.

गोव्यातील 40 आणि उत्तराखंडमधील 70 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये गोव्यातील11 लाख मतदारांनी, उत्तराखंडमधील 81 लाख मतदारांनी तर उत्तरप्रदेशमधील 2 कोटी मतदार मतदान करणार होते. त्यापैकी गोव्यात 78.94 टक्के, उत्तराखंडमध्ये 62.5 टक्के तर उत्तरप्रदेशमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

या निवडणूकीच्या रणसंग्रामात उत्तरप्रदेशातील दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी बहुतांश जागा मुस्लिम बहूल आहेत. मात्र 2017 च्या निवडणूकीत यापैकी 13 जागा समाजवादी पक्षाला तर 40 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. मात्र बसपाला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. दरम्यान या स्पर्धेत काँग्रेसच्या वाट्याला एकही जागा आली नव्हती. त्यानंतर आता पाच वर्षांच्या कालावधीनंतर मतदारांनी आपला कौल दिला आहे. त्यामुळे सत्तेचा मुकुट कोणाकडे असणार हे अजून निश्चित नाही.

गोवा राज्यात भाजप, काँग्रेससह, मगोप, गोवा फॉरवर्ड पक्ष, शिवसेना, भाजप, आप आणि तृणमुल काँग्रेस निवडणूकीच्या मैदानात आहेत. तर आपल्या अनोख्या प्रचाराने रिव्हॉल्युशनरी गोवा पक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान गोव्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

उत्तराखंडमध्येही निवडणूकीच्या आधी मुख्यमंत्री पदाची खांदेपालट करून भाजप निवडणूकीला सामोरे गेला होता. त्यामुळे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरीष रावत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Tags:    

Similar News