RSS प्रमुख मोहन भागवतांचं भाषण कुणी लीक केलं ?

Update: 2023-10-24 06:42 GMT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस म्हणजे विजयादशमी. यादिवशी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरच्या रेशीमबाग इथं संघाचे प्रमुख मार्गदर्शन करत असतात. या मार्गदर्शनपर भाषणातून संघाला भविष्यात काम करण्याची दिशा मिळते. मात्र, या विजयादशमीला काही वेगळचं घडलंय. संघाचे प्रमुख असलेल्या डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन करण्यापूर्वीच त्यांचं भाषण लीक झालं.

संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाकडे संघाच्या स्वयंसेवकांचं लक्ष लागलेलं असतं. मात्र, प्रत्यक्षात डॉ. मोहन भागवत यांचं भाषण होण्याआधीच ते लिखित स्वरूपात माध्यमांपर्यंत पोहोचलं होतं. त्याचा उल्लेख खुद्द डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात केला.

दरम्यान भागवत म्हणाले की, "भाषण करण्याअगोदरचं माझ लिखित भाषण हे माध्यमांपर्यंत पोहचलं आहे, त्यामुळं त्याची चर्चा तर होणार आहेच. संघाच्या प्रमुखांचं भाषण आजपर्यंत कधीही लीक झालेलं नव्हतं. अशा परिस्थितीत भागवतांचं भाषण लीक कुणी केलं असा प्रश्न उपस्थित होतोय.

भागवतांनी आपल्या भाषणात मणिपूरचा उल्लेख केला. ते म्हणाले,” काही लोकांना भारतात शांतता नको आहे. धर्मांध वेडेपणा पसरवतात. त्यामुळे जगात युद्धे होत आहेत. दिल्लीत G-20 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परदेशी पाहुण्यांच्या आदरातिथ्याबद्दल भारताचे कौतुक करण्यात आले. दरम्यान मणिपूरमधील अशांततेमागे विदेशी शक्तींचा हात असल्याचं सुचक वक्तव्य भागवतांनी यावेळी केलं.

Tags:    

Similar News