UP Election : उत्तरप्रदेशात भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत पंतप्रधानांचे संकेत
उत्तरप्रदेश निवडणूकीसाठी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? याबाबत पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.;
पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपुर आणि उत्तरप्रदेश या निवडणूकांपैकी उत्तरप्रदेश निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. तर उत्तरप्रदेशात कोणाची सत्ता येणार आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत घोषणा करण्यात येत आहेत. त्यातच भाजपचा मुख्यमंत्री पदासाठी कोण उमेदवार असणार? याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिले आहेत.
उत्तरप्रदेश निवडणूकीची धूम रंगली आहे. त्यातच समाजवादी पक्षातर्फे अखिलेश यादव, बसपाकडून मायावती, भाजपकडून योगी आदित्यनाथ यासह काँग्रेसकडून प्रियंका गांधींच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जात आहे. तर भाजप आणि काँग्रेस वगळता इतर पक्षांनी आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत स्पष्टता राखली आहे. मात्र यावेळी भाजप योगींनाच पुन्हा संधी देणार की इतर कुणाला? असा प्रश्न नागरीकांच्या मनात पडला आहे. त्यामुळे यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशसाठी भाजपचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार याबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूकीच्या प्रचारानिमीत्त तिसऱ्या ऑनलाईन प्रचारसभेत बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले. तर समाजवादी पक्षाची सत्ता असताना कायदा आणि सुव्यवस्था बत्तर होती. मात्र योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेताच परिस्थिती बदलली. परंतू कोरोनाच्या काळाने उत्तरप्रदेशाचे नव्हे तर देशाचे नुकसान केले. मात्र कोरोनाचा काळ नसता तर योगींची कामगिरी आणखी उज्वल असती. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपचे सरकार पुन्हा आले तर गरीबांना वेगाने घरे देण्यात येतील. त्यामुळे उत्तरप्रदेशची जनता भाजपला पुन्हा बहूमत देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. याबरोबरच योगी आदित्यनाथ हे उत्तरप्रदेशचे पुढील मुख्यमंत्री असतील याबाबत संकेत दिले.