मुंबईतील बिल्डरांकडून 300 कोटींची वसूली करणारा जितेंद्र नवलानी कोण? – संजय राऊत
संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अनेक खुलासे केले. त्यामध्ये त्यांनी भाजपवर टीकास्र सोडले. तर पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी मुंबईतील बिल्डरांकडून 300 कोटी रुपयांची वसूली करणारा जितेंद्र नवलानी कोण? असा प्रश्न विचारत भाजपवर गंभीर आरोप केला.;
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. त्यामध्ये किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर संजय राऊत यांनी टीकास्र सोडले. त्यामध्ये संजय राऊत म्हणाले की, पीएनबी बँक घोटाळ्यातील राकेश वाधवान हे किरीट सोमय्या यांच्या पुत्राचे पार्टनर असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच भाजपचे माजी वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या मुलीच्या लग्नात 9 कोटी रुपयांचे रेड कार्पेट टाकल्याचा आरोप केला. तर त्याची चौकशी का झाली नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, चार महिन्यांपासून मुंबईतील प्रतिष्ठीत बिल्डरांकडून 300 कोटी रुपयांची वसूली सुरू आहे. त्यामुळे मी मोदी आणि शहांना पत्र लिहीणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. तर ही वसूली करणारा जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्याबरोबरच जिंतेंद्र नवलानी, फरीद शमा, रोमी नेमके कोण आहेत? असेही राऊत यांनी विचारले.
यासह संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाला होता. तर महाआयटीच्या निविदा न काढताच टेंडर कसे मिळाले? असे विचारत अमोल काळे, धवांगळे कोण आहेत, असा प्रश्न राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत दिसतील, असे विधान केले होते. तर या साडेतीन लोकांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येईल, असे राऊत म्हणाले. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका करत मुंबईतून 300 कोटी रुपयांची वसूली भाजपने केल्याचा आरोप केला आहे.