महाराष्ट्रात नेमका कोणाचा खून झाला आहे? प्रविण दरेकर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर हे दोन प्रकरण चांगलीच गाजली. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची मुंबई पोलिसातील अधिकारी सचिन वाझे यांनी हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
मात्र, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत बोलताना मनसुख हिरेंना न्याय द्या. मनसुख हिरे यांचा खून झाला आहे. असं म्हणायची ऐवजी त्यांच्या तोंडून सचिन वाझे यांचा खून झाला आहे. त्याला न्याय द्या. अशी मागणी केली आहे. प्रविण दरेकर यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.