Facebook | फेसबुक वर पहिलं अकाऊंट कुणी काढलं होतं ?

Update: 2023-02-04 03:57 GMT

जगात आजमितीस सगळ्यात शक्तीशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) असलेल्या फेसबुकचा आज वाढदिवस (Facebook) आहे. फेसबुक वापरत नाही किंवा माहित नाही अशी क्वचितच एखादी व्यक्ती आपल्याला या भूतलावर सापडेल. अशा या फेसबूक शी संबंधित अनेक गोष्टी आज यानिमित्तानं समजून घेऊया.

सुरूवातीच्या काळात फेसबुकचं नाव thefacebook.com असं होतं. हॉवर्ड विद्यापाठीच्या ( विद्यार्थ्यांनी ४ फेब्रुवारी २००४ मध्ये हे लॉन्च केलं होतं. २००६ मध्ये फेसबुक सामान्य लोकांच्या सेवेत दाखल झालं. मार्क झुकेरबर्ग आणि हॉवर्ड विद्यापीठातील (Harvard University) त्याचे सहकारी इड्युर्डो सेवरिन, अँड्रयू मॅक्युलम, डस्टीन मॉस्कोविज आणि ख्रिस ह्युजेस यांनी मिळून फेसबुकची स्थापना केली. (Eduardo Saverin, Andrew McCollum, Dustin Moskovitz and Chris Hughes )

फेसबुकच्या आधी ऑर्कुट, मायस्पेस हे सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मस होते. मात्र, लाईव्ह फीड शेअरिंग, मित्रांच्या अकाऊंटवर जाऊन मजकूर पोस्ट करणं अशा अनोख्या सेवांमुळं फेसबुक लोकप्रिय झालं. स्टॅटिस्टा च्या म्हणण्यानुसार, फेसबुक हे जगातील ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी सर्वात जास्त वापरलं जाणारं माध्यम आहे. जगात २०२२ च्या सुरुवातीस २९३ कोटी युजर्स होते फेसबुकचे. २०२१ मध्ये अमेरिकन नागरिक सर्वाधिक वेळ हा फेसबूकवरच खर्च करत होते. त्यानंतर टिकटॉक आणि ट्विटर चा नबंर लागतो.

फेसबुक कधी सुरू झालं ?

४ फेब्रुवारी २००४ रोजी thefacebook.com या नावानं फेसबुकची सुरूवात झाली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना माहिती मिळण्यासाठी फेसबुकची सुरूवात केल्याचं फेसबुकचा संस्थापक सदस्य ख्रिस ह्युजेसचं म्हणणं आहे. त्यानंतर २००५ मध्ये 'the' हे नाव काढून टाकण्यात आलं, आणि २००६ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यां व्यतिरिक्त इतरांनाही फेसबूक वापरण्याची परवानगी देण्यात आली.

फेसबुकवर पहिली पोस्ट कुणी लिहिली ?

फेसबुकवर सर्वात पहिली पोस्ट कुणी लिहिली, पहिलं अकाऊंट कुणी काढलं याविषयी उपलब्ध माहितीनुसार फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गनंच (Mark Zuckerberg) पहिलं फेसबुक अकाऊंट काढलं होतं. मात्र, झुकेरबर्गची फेसबुक आयडी ही चौथी फेसबुक आयडी असल्याचं त्याची प्रोफाईल सांगते. कारण फेसबुकचे पहिले तीन अकाऊंट हे चाचणीसाठी होते. चाचणीनंतर हे तीनही अकाऊंट बंद करण्यात आले त्यामुळं झुकेरबर्गचं अकाऊंट हे चौथ्या क्रमांकाचं अकाऊंट म्हणून ओळखलं जातं.

Tags:    

Similar News