महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक प्रक्रिया पार पडली आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाल संपत आहे. या तारखेच्या अगोदरच महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येईल अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत कोणत्या विभागाला कितीवेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली याची माहिती घेऊयात....
मुख्यमंत्रीपद कोणत्या विभागाला किती संधी मिळाली?
कोकण ५ वेळा
पश्चिम महाराष्ट्र ७ वेळा
विदर्भ ४ वेळा
मराठवाडा
३ वेळा