सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचाराची मुभा सरकारने दिली आहे का? फडणवीसांचा खडा सवाल
उद्यापासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय आधिवेशन सुरु होत असताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचे कारण सांगुन चहापानाला बोलावलेच नाही, अन्यथा चहापानाला गेलो असतो. आम्हाला या सरकारला एवढंच विचारायचं आहे, की सामान्य जनतेला आणि सत्ता पक्षाच्या नेत्यांना वेगळा न्याय आहे का? सत्ता पक्षाच्या नेत्यांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा शक्ती कायद्याने दिली का? असा सवाल विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला.
आधिवेशनाच्या आधी विरोधकांची बैठक मुंबईत गरवारे क्लबमधे पार पडली. त्यानंतर ते पत्रकार परीषदेत बोलत होते. महाविकास आघाडी ने बदल्यांमध्ये भूतो न भविष्यति असा भ्रष्टाचार केला असं देवेंद्र फडणवीस यांचा पहीलाच सरकारवर आरोप केला. नैसर्गिक संकटात सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे सांगितले. महीला अत्याचारामधे आघाडीतील नेते सहभागी असल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीचा युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे या प्रकरणात सरकारनंच दोषींची पाठराखन करत असल्याचा आरोप केला.
संजय राठोड प्रकरणातील चौकशी पोलिसा अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केले पाहिजे अशी मागणी करत फडणवीस, म्हणाले, कोणती नवी शक्ती या नेत्यांना तुम्ही दिली. शक्ती कायदा वैगेरे सगळा फार्स आहे. कायदे करुन काहीही हाती येणार नाही. कारण हे कायदे सत्ता पक्षाला लागू होत नाहीत. त्यामुळे संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामा देणार, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
पूजा राठोड मृत्यू प्रकरणात पुरावे समोर असताना कुठलीही कारवाई होत नाही. एवढे पुरावे एखाद्या प्रकरणासाठी पुरेसे आहेत. पुरावे असताना पोलीस कारवाई करत नाही, मंत्री राजीनामा देत नाही, सरकारही काही कारवाई करत नाही. त्यामुळे मी या प्रकरणात संजय राठोड यांना दोष देणार नाही. त्यांना त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. म्हणून हे सर्व शक्य आहे. त्यामुळे राज्यात या सरकारचा चेहरा उघड झाला आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून पुणे पोलिसांवरही फडणवीस यांनी टीका केली. याप्रकरणात पोलिसांची झालेली लाचार अवस्था आम्ही याआधी कधी पाहिलेली नाही. पुणे पोलिसांचे जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारनं लाचारपणाची सीमा गाठली आहे. कॉंग्रेसच्या नादी लागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या जयंतीला अभिवादन देखील केले नाही, असा आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षण प्रश्नी आजच्या बैठकीला मला पहिल्यांदाच बोलवले आहे; मी या बैठकीत सहभागी होणार आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. ज्यातील दोन कुलगुरुंनी राजीनामा दिलाय हे फार गंभीर आहे.याबाबत आम्ही राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. पेट्रोलवर केंद्राचा कर 29 रुपये लिटर असून यातील ११ रुपये पुन्हा राज्याला मिळतात. इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्यासाठी राज्य सरकारचा 27 रुपये प्रतिलिटर कर कमी करा असं फडणवीसांनी सूचवलं आहे. वैधानिक विकास महामंडळ स्थापन न करणे हा विदर्भ आणि मराठवाड्यासाठी द्रोह असून वैधानिक विकास महामंडळ स्थापन झाल्याशिवाय आम्ही बजेट मांडू देणार नाही, असा इशारा फडणवीसांनी दिला.
पुढची दहा पंधरा वर्षे ही देशांमध्ये मोदी लाट राहणार आहे.महा विकास आघाडी सरकारचा एकमेकांमध्ये पायपोस नाही त्यामुळे ते टिकणार नाही असं फडणवीस म्हणाले. महा विकास आघाडी सरकार हे अस्थिर आहे यांच्यामधील नेते घाबरलेले आहेत, संधी मिळाली तर आमदार सोडून जातील या भीतीने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही असं फडणवीस यांनी शेवटी सांगितलं.