जिथं अनाथ तिथं शाळा..

अनाथ निराधार आणि निराश्रित मुलांसाठी हस्ताक्षर कलेच्या माध्यमातून परिवर्तनाचे काम ध्यान फाउंडेशनचे काशीराम धांडे यांनी सुरू केले आहे.

Update: 2023-01-07 08:23 GMT

राष्ट्रपती गौरवांकित हस्ताक्षर कलावंत आश्रय ध्यान फाउंडेशनचे अध्यक्ष आणि समाजसेवक विनायक काशीराम धांडे यांनी अतिशय कठोर परिश्रमातून हस्ताक्षर कला पूर्णपणे जोपासली आहे. ती कला अपेक्षित अनाथ निराधार निराश्रीत भटकलेली मुलं शाळा बाह्य बालमजूर स्थलांतरित वर्गातील मुले आदिवासी वापरत आहेत. सदर कलेतून विद्यार्थ्यांना प्रभावीत करून आवड रुची निर्माण करतात व नंतर त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचेत मनोबल मनोधर्य वाढवून त्यांच्यात जिद्द चिकाटी आत्मविश्वास हा जागृत करून त्यांना शिक्षण प्रवाहात ओढत त्यांना शिक्षण शैक्षणिक साहित्यांचे वाटपही करतात व त्याचप्रमाणे त्यांना धडेही देतात गेली 25 वर्षापासून धांडे समाजकार्य करीत आहेत.

गेल्या कोरोना संसर्गात ही जीवनाचे रान करीत स्वतःची ही परवा न करता घराला कुलूप ठोकून जिथे पीडित रुग्ण पांगळे दिव्यांग कुपोषित पीडित असणाऱ्या अशा दुर्गम भागातील आदिवासी भागात जाऊन त्या लोकांना आरोग्य विषयी काळजी तशीच त्या लोकांना खबरदारीचे मार्गदर्शन केले या सर्वांचे जाणून घेण्यास व संकल्प केला.या लोकांसाठी त्यांचे हक्कासाठी व त्यांना न्याय मिळण्यासाठी स्वतःच्या घरापासून तर दिल्लीच्या दरबारापर्यंत प्रदीर्घ पायी चालत थेट मा. राष्ट्रपती व मा. नरेंद्रजी मोदी यांना निवेदन देण्याची दुढ सकल्पना धांडेंनी बोलून दाखवली व नवीन वर्षानंतर धांडे हा पाई प्रवासांचा अद्भुत असा विक्रम करणार आहेत यासाठी त्यांची प्रतिक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे असल्याचे धांडे यांनी सांगितले.

Tags:    

Similar News