कोरोनाची लाट संपणार कधी? आरोग्य मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने राज्याचे टेन्शन वाढवले असताना कोरोनाचा नवा व्हेरियंट न्यकॉव पुढे येत आहे. त्यापार्श्वभुमीवर कोरोनाची लाट कधी संपणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे.;

Update: 2022-01-30 02:58 GMT

डेल्टा पाठोपाठ ओमायक्रॉन आणि आता न्यूकॉव या नव्या व्हेरियंटची चर्चा सुरूआहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असे सांगतानाच ही लाट संपणार कधी याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली.

कोरोनाच्या संकटाचा सामना करताना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. मात्र त्यातुलनेत कोरोना लसीच्या प्रभावामुळे तिसरी लाट सौम्य असल्याचे जाणवत आहे. त्यातच ओमायक्रॉन या व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत असला तरी लोकांना गंभीर लक्षणे दिसत नाहीत. ओमायक्रॉनच्या रुपाने राज्यात तिसरी लाट आलेली आहे.

ओमायक्रॉन पाठोपाठ न्यूकॉव हा नवा व्हेरियंट चीनमधून समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, न्यूकॉव हा नवा व्हेरीएंट चीन मधून आला आहे. मात्र याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनाकडून अद्याप मिळाली नाही. मात्र या नव्या विषाणूमध्ये मृत्यूदर अधिक आहे. पण सध्या या नव्या विषाणूचा कुठलाही रूग्ण आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या कुठलीही चिंता नाही. तसेच कोरोनाचे संकट टळूस्तोवर मास्कमुक्ती करता येणार नाही. सध्या संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे तज्ञांच्या मतानुसार मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत कोरोना संपुष्टात येऊ शकतो. तरीही नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी कले. राजेश टोपे पंढरपुर येथे बोलत होते. त्यांनी विठ्ठलदर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी कोरोनाची लाट

Tags:    

Similar News