नाना पटोलेंच्या पोतडीत दडलंय काय? थोड्याच वेळात खुलासा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत थोड्याच वेळात मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.;
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष टिपेला पोहचला आहे. त्यातच मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्वीट करत थोड्याच वेळात मोठा खुलासा करणार असल्याचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी नाना पटोले यांनी मी मोदीला मारु शकतो, शिव्याही देऊ शकतो, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजपने नाना पटोलेंचा जोरदार निषेध व्यक्त केला होता. तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर नाना पटोले यांनी मोदी हा स्थानिक गावगुंड असल्याचे सांगत सारवासारव केली होती. मात्र भाजपने नाना पटोलेंना जोरदार विरोध केला होता. मात्र आता नाना पटोले यांनी ट्वीट केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नाना पटोले यांनी सकाळी ट्वीट करत म्हटले की, इतर राज्यात राज्यपाल असतात, मात्र महाराष्ट्रात भाजपाल आहेत. तर त्यापाठोपाठ नाना पटोले यांनी ट्वीट करत म्हटले की, थोड्याच वेळात मोठा खुलासा करत आहे. गांधी भवन, पहिला मजला तन्ना हाऊस, रिगल सिनेमाजवळ कुलाबा मुंबई, असे ट्वीट केले आहे. त्यामुळे नानांच्या पोतडीत नेमकं काय दडलंय, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर ईडीच्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीने संताप व्यक्त करत निदर्शने केले होते. मात्र नवाब मलिक यांचा राजीनामा घेतल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा भाजपने दिला आहे.
दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत गोंधळ घातल्यामुळे राज्यपालांनी अभिभाषण थांबवत तडक निघून गेले. त्यामुळे घटनात्मक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभुमीवर नाना पटोले नेमका काय खुलासा करणार?, त्यांचा इशारा नेमका कोणावर असणार ? हे थोड्याच वेळात समजणार आहे.
थोड्याच वेळात मोठा खुलासा करत आहे. गांधी भवन, पहिला मजला तन्ना हाऊस, रिगल सिनेमाजवळ कुलाबा मुंबई.
— Nana Patole (@NANA_PATOLE) March 4, 2022