दिल्लीत काय घडतयं?

कोरानाची दुसरी लाट स्थिरावत असताना केंद्रातील मोदी सरकारने आता इमेज मेकर ओव्हरसुरू केले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आत्ताच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा देखील सुरू झाले आहेत.;

Update: 2021-06-15 06:02 GMT

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल दिल्ली भेट दिल्यानंतर यासंबंधीच्या चर्चेला उधाण आले असून संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असून या विस्तारात संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची नावे चर्चेत आहेत संधी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार.

विस्तारात संधी मिळावी म्हणून अनेक नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

कोणाच्या दूसरा लाटेनंतर देशात चार लाखापेक्षा जास्त लोकांना मृत्युमुखी पडू लागली आहे या सगळ्या दरम्यान आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी नाचक्की झाली होती. कुरुळा चा संसर्ग सुरू असताना चालू असलेल्या कुंभमेळा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुळे त्यात भरच पडली होती. भाजपच्या अंतर्गत गोठ्यामध्ये याबाबत नाराजी असून आता ही प्रतिमा बदलण्याच्या दृष्टीने भविष्याची रणनीती आखण्याची सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यामुळे अनेक नाराजांना संधी मिळेल त्यामुळे पक्षांतर्गत खदखद दूर होऊन आगामी धोरण निश्चित करता येईल असा भाजप अटकळ आहे.

करोना स्थितीमुळे केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार सातत्याने लांबणीवर पडला आहे. आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चाचपणी सुरू केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू, काही नव्या चेहऱ्यांची वर्णी तर काही मंत्र्यांचा खातेबदल केला जाण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने पंतप्रधान मोदी यांनी नुकतीच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता मंत्र्यांचे प्रगतीपुस्तकही तपासले जाणार असून त्याआधारावर विस्ताराला अंतिम रूप दिलं जाणार आहे.

राजधानीत या हालचाली सुरू असतानाच इच्छूकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि प्रीतम मुंडे ही दोन नावे चर्चेत आली आहेत. राणे हे मंत्रिपदाबाबत आधीपासूनच आशावादी आहेत. त्यात अमित शहा सिंधुदुर्ग येथे आले होते तेव्हा त्यांनी राणे यांच्या कार्याचा गौरव केला होता. 'भाजपमध्ये नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचा सन्मानच होईल', असे सूचक विधान शहा यांनी केले होते. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसोबतच राणे यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्य म्हणजे राणे हे आजच दिल्लीला रवाना झाले असून ते जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे कळते. याबाबत राणे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शिवसेनेला शह देण्यासाठी तसेच मराठा नेता म्हणून राणे यांच्या नावाचा विचार मोदींकडून होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या डॉ. प्रीतम मुंडे यांचे नावही मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. बीडमधून त्या दोन वेळा निवडून आल्या आहेत. मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर त्यांचं पारडं जड मानलं जात आहे.

दरम्यान, शिवसेना आणि अकाली दल या दोन पक्षांनी एनडीएला रामराम ठोकला आहे. या पक्षांच्या वाट्याला आलेली दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. कॅबिनेट मंत्री रामविलास पासवान आणि राज्यमंत्री सुरेश आंगडी यांच्या निधनामुळे ती पदेही रिक्त आहेत. त्यात मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये एकदाही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. काही मंत्र्यांकडे अतिरिक्त मंत्रालयांचा भार दिला गेलेला आहे. हे पाहता बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार आता टाळला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यात आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, खासदार ज्योतिरादित्य शिंदे, वैजयंत पांडा ही नावे आधीपासूनच चर्चेत आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना आधी शपथ विधी होईल. महाराष्ट्रातून आणि देशातून कोणाची त्यामध्ये वर्णी लागते हेदेखील पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

Full View
Tags:    

Similar News