BEED | अंजली दमानिया यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा. यासह या प्रकरणातील वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली जावी. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर दमानिया यांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे.