राज्याच्या राजकारणात रोज नवनवीन भूकंप होत आहेत. अडीच वर्षांमध्ये राजकारणात अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. अशाच प्रकारचं काही मागच्या तीन दिवसांपासून घडत आहे. ज्याप्रमाणे शिवसेनेत फूट पडली त्याचप्रमाणे राष्ट्रवादीत सुद्धा फूट पडली आणि अजित पवार गट सत्तारूढ पक्षासोबत गेला. इतकाच नाही तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सगळं होत असताना नेहमी या राजकीय नेत्यांकडून हे आम्ही राज्याच्या विकासासाठी करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण हे राज्याच्या विकासासाठी होत आहे की खुर्चीच्या स्वार्थासाठी? याविषयी पुणेकरांनी बिंदासपणे आपलं मत व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थिती विषयी पुणेकरांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत पहा...