West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रशांत किशोर यांचा सवाल

West Bengal Election: निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रशांत किशोर यांचा सवाल West Bengal Election prashant kishor raise questions on election commission of india;

Update: 2021-04-13 11:52 GMT


सध्या पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक सुरु आहे. यातच निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक प्रचाराची 24 तासांची बंदी घातली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी १ दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केले.

 प. बंगालमध्ये मुस्लीम मत आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही यासंबंधी निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना दोन नोटीसा पाठवल्या होत्या. 

ममता बॅनर्जी यांच्या प्रचारावर १ दिवस बंदी घातल्यानं बॅनर्जी यांनी आज निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन आंदोलन केले.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय लोकशाहीविरोधी आणि असंविधानिक असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. आज कोलकात्यात गांधी मुर्ती या ठिकाणी दुपारी 12 वाजता त्यांनी धरणं आंदोलन केलं. ममता बॅनर्जी यांच्या या आंदोलनाने भारतीय निवडणूक आयोगाच्या कारवाईवर सोशल मीडियावर सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.


एवढंच नाही तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे रणनितीकार प्रशांत किशोर यांनी देखील निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.


NDTV ला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणतात…

तृणमूल काँग्रेसला आणि भाजपला कोणाला किती जागा मिळतील हे सांगणं कठीण आहे. मात्,र मी डिसेंबर मध्ये म्हंटल होतं की बंगालमधील एकूण परिस्थिती पाहता भाजपकडे राजकीय शक्ती असली तरीदेखील भाजप निवडणुकीमध्ये १०० चा आकडा पार करू शकत नाही. त्यामुळे बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचाच मोठा विजय होईल असं एकूणच दिसून येत आहे. झालेल्या चारही टप्प्यांच्या निवडणुकीतून सुध्दा हेच दिसून आलं. मात्र, भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मोठा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. पहिल्या ४ टप्प्यात जोरदार सामना होणार याच्याशी मी सहमत आहे. पण कोणतंही मोठं राज्य एकाच पद्धतीने मतदान करत नसतं. राज्यामध्ये प्रदेश, जिल्हा, तालुका यांचा समावेश होतो. जर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर निवडणुकांमधील चारही टप्यांमध्ये भाजपला चांगलं पाठबळ मिळालेलं आहे. 

निवडणूक आयोगाची रचना…


पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात मतदान होत आहे. या ८ टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांवर प्रशांत किशोर यानी सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणातात…

 निवडणूक आयोगाने केलेल्या रचनेबद्दल मला त्यांच्यावर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही. मात्र निवडणूक आयोगाने बनवलेल्या नियमानुसार या निवडणुकीची रचना एका विशिष्ट पक्षासाठीच बनवली आहे त्यांना मदत करण्यासाठीच बनवली गेली आहे. कारण भाजपच्या सर्व जागा या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, टप्प्यातील निवडणुकीमध्ये आल्या आणि तृणमूल काँग्रेसच्या जागा या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.


जास्त काळापर्यंत सुरु राहणारी निवडणूक भाजपसाठी फायदेशीर आहे. हे लोकांना समजणं गरजेचं आहे. कारण निवडणुकीची सुरुवात ही भाजपला मजबूत पाठबळ असणाऱ्या ठिकाणाहून झालेली आहे. आणि भाजप याचा फायदा प्रचारामध्ये चांगली छबी निर्माण करण्यासाठी करत आहे. ज्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसची पकड आहे. त्याठिकाणी भाजपचा प्रचार व प्रसार करण्याचे प्रयत्न करत आहे. या सगळ्यामुळेच निवडणूक आयोगाची ही रचना एका पक्षासाठी नसून दोनही पक्षांसाठी पारदर्शक पद्धतीने करण्याची गरज होती. असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलं आहे.

माझ्या ८ ते १० वर्षाच्या कारकिर्दीत मी अशाप्रकारच्या निवडणूक अजूनही पाहिलेल्या नाहीत. दक्षिण 24 परगन्यामध्ये तृणमूल काँग्रेसची चांगली पकड आहे. तिथे एकूण ३१ जागा आहेत. तरीही तिथे ३ टप्प्यामध्ये निवडणूक घेण्यात आली. ही कोणत्याप्रकारची निवडणूक पद्धत आहे. ते काळत नाही. 

अमित शहांची भविष्यवाणी खोटी ठरलेली राज्य…

अमित शहा हे राजकारणातलं मोठं व्यक्तीमत्व आहे. भाजपच्या अनेक विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, त्यांनी केलेलं वक्तव्य भाजप 200 जागांनी निवडून येईल" हे कितपत योग्य आहे. अशा प्रकारची भविष्यवाणी करणं त्यांना कसं जमतं. त्यांनी याअगोदर दिल्ली, हरियाणा, झारखंडच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशा प्रकारच भाष्य केलं होतं.

नरेंद्र मोदी लोकप्रिय…

भाजपला 40 टक्के मतदान मिळालं. त्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, दलित लोकांकडून मिळालेलं पाठबळ तसेच हिंदी भाषेतील भाजपची पकड या कारणांमुळेच भाजपला बंगाल निवडणुकीमध्ये 40 टक्क्यांनी मतदान मिळालं. 


कोण मारणार बाजी?

भाजपकडे राजकीय बळ असलं तरीसुद्धा बंगालमधील निवडणुकांमध्ये तृणमूलच सरकार येणार… ममता बॅनर्जी या आजही बंगालच्या लोकप्रिय आणि ताकदवर नेत्या आहेत. बंगाल मधील महिला या ममता बॅनर्जी यांना सपोर्ट करतात व 80 टक्के महिला या मतदान करतात. त्यामुळे तृणमूल काँग्रेसचा विजय होईल यात काही शंका वाटत नाही. असा विश्वास प्रशांत भूषण यांनी व्यक्त केला आहे.

Tags:    

Similar News