प्रजासत्ताक दिनी झळकणार पालघर जिल्ह्यातील वारली चित्र शैली
देशाचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनी संचलनात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या चित्राचा समावेश असणार आहे. २६ जानेवारी रोजी होणाऱ्या नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनी संचलनात आदिवासी संस्कृतीचा इतिहास ६ बाय ४५ फुटांच्या चित्रातून साकारण्यात आला असून देशभरातील २५० आदिवासी चित्रकारांनी ते साकारले आहे.

आदिवासी चित्रशैली साकारण्यात पालघर जिल्ह्यातील २० वारली चित्रकारांचाही यामध्ये समावेश असून अमृत महोत्सवी कार्यक्रमातून जगाच्या कानाकोपऱ्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. साकारण्यात आलेल्या या चित्रशैली करिता देशभरातील आदिवासी बहुल भागातील २५० चित्रकार यामध्ये सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यातील २० कलाकार असून डहाणूच्या गंजाड गावचे जगप्रसिद्ध वारली चित्रकार पद्मश्री कै. जिव्या सोमा म्हसे यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांचे शिष्य व १७ जण सहभागी आहेत. तर, विक्रमगड तालुक्यातील तीन जणांचा सहभाग आहे.
या चित्रात स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीतील ६ बाय ४५ फुटांच्या चित्र रूपातून साकारण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यापूर्वी देशभरात आदिवासींवर होणारा छळ व अन्याय, त्याविरुद्ध त्यांनी दिलेला लढा आणि स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासाठी संघटना तसेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर समुहाने एकत्र राहून शेती व शेतीपूरक व्यवसाय करत असल्याचे चित्रात दाखविण्यात आले आहे. ५ चित्रांच्या या मालिकेत आदिवासी वर्षांनुवर्षे नैसर्गिक व गावदेवाचे पूजन करणे, अशा विविध घटना प्रसंगही दर्शविण्यात आले आहेत. यासाठी पंजाब येथील चितकारा युनिव्हर्सिटीत २४ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हे वर्कशॉप नॅशनल गॅलरी ऑफ मॉडन आर्ट न्यू दिल्ली यांच्याकडून घेण्यात आले.