भिवंडी // भिवंडीतील वळगाव हद्दीतील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील प्लास्टिकच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या भीषण अग्नितांडवात
भिवंडीतील 10 गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.सुदैवाने या आगीच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून , आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, या आगीत गोदमातील साहित्य जळून खाक झाले आहे.
ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
ही आग एवढी भीषण होती दूरवरून आगीचे लोट पाहायला मिळत होते. या गोदामामध्ये प्लास्टिक असल्याने आगीने आणखी रौद्ररूप धारण केले होते. या आगीमुळे परिसरात दुराचे लोट पसरले होते.