पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलच्या वेटरने आत्महत्या केल्याची घटना घडली. अरविंद सिंह राठौर (वय २६, रा. सनेती, उत्तराखंड) असे या वेटरचे नाव आहे. त्याने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान मुंढवा पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
अरविंद सिंहने हॉटेलच्या तेराव्या मजल्यावरून उडी मारून, आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी आपल्याला फसवले असल्याचा आरोप केला होता. आपली फसवणूक झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले. त्यानंतर अरविंद सिंह यांनी तेराव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली.
अरविंद सिंह हा मूळचा उत्तराखंड राज्यातील रहिवासी आहे. एक महिन्यापूर्वीच तो पुण्यात कामाला लागला होता. तो हॉटलच्या पेंट हाऊसमध्ये तो राहात होता. मात्र , त्याने अचानक आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.