विनायक मेटे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात स्वत: मेटे आणि त्यांच्या समर्थकांनी मंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार करण्याची मागणी केली होती. तसेच मेटे यांना वाढदिवसाचे गिफ्ट हे मंत्रीपदाच्या रुपाने मिळावे, अशी मागणी भारती लव्हेकर यांनी त्यावेळी केली होती. त्याच कार्यक्रमात राजकारण गिफ्ट नाही तर सरप्राईज गिफ्त मिळते, असे सांगत फडणवीस यांनी मेटेंना मंत्रीपद देण्याचे संकेत दिले होते. पण आता त्यांच्या अकाली निधनामुळे राजकारणातले ते सरप्राईज गिफ्ट त्यांना मिळालेच नाही....