सावरकरांचे चरित्रकार विक्रम संपत अडचणीत, इतिहासकारांनी केला आहे साहित्यचोरीचा आरोप

हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर यांचे चरित्रकार विक्रम संपत यांनी सावरकरांचे चरित्र लिहीताना साहित्यचोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सावरकरांचे चरित्रकार विक्रम संपत अडचणीत आले आहेत. तसेच त्यांना देण्यात आलेले ब्रिटन येथील रॉयल हिस्टोरिकल सोसायचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.;

Update: 2022-02-15 07:00 GMT

विक्रम संपत यांनी हिंदूत्ववादी नेते विनायक दामोदर सावरकर यांचे दोन खंडामध्ये चरित्र लिहीले आहे. मात्र त्यामधील 50 टक्क्यांपेक्षा अधिक भाक बाखले व चतुर्वेदी या इतिहासकारांच्या साहित्यातून घेतला असल्याने साहित्यचोरी करणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये पकडला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे, असे वृत्त द वायरने दिले आहे.

विक्रम संपत यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर प्रसिध्द झालेल्या लेखातील अनेक वाक्ये दोन इतिहासकारांच्या लेखांमधून जसेच्या तसे कॉपी केले आहेत. मात्र त्याबद्दल या लेखांच्या मुळ लेखकांना संपत यांनी कोणत्याही प्रकारचे श्रेय देण्यात आले नाही.

विक्रम संपत यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील इतिहासकार विनायक चतुर्वेदी यांच्या ' रिव्हॉल्युशनरीज बायोग्राफी : द केस ऑफ व्ही. डी. सावरकर' या शीर्षकाखाली लिहीलेल्या पोस्टकलोनियल स्टडीज या नियतकालिकातील लेख आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील जानकी बखाले यांनी लिहेल्या सावरकर सेडिशन अँड सर्व्हायलन्स : द रुल ऑफ लॉ इन ए कलोनियल सिच्युएशन या लेखातील काही भागाची चोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर यातील पहिला लेख 2013 साली प्रसिध्द झाला होता. याबरोबरच संपत यांनी पॉल स्कॅफल यांनी लिहीलेल्या 2012 सालच्या प्रबंधातील उतारा चोरल्याचा आरोप तीन इतिहासकारांनी केला आहे. त्यामुळे संपत यांनी कॉपीराईट नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच ब्रिटनच्या रॉयल हिस्टॉरिकल सोसायटीच्या आचारसंहितेचाही भंद केल्याप्रकरणी विक्रम संपत यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी इतिहासकारांनी केली आहे.

द वायरशी बोलताना विक्रम संपत यांनी इतिहासकारांचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच ज्यांच्या लेखनातील संदर्भ घेतला आहे. त्याचे श्रेय संबंधीतांना दिले असल्याचे सांगितले. त्यामुळे आरोप करणारांसह ज्या माध्यमांनी वृत्त दिले आहे. त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे, असे वृत्त द वायरने दिले आहे.

चतुर्वेदी आणि बाखले यांनी द वायर या माध्यमाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी याबाबत प्रतिक्रीया देतांना हे फार निराशाजनक असल्याचे सांगितले आहे. तसेच सारवकर हे ज्ञाननिर्मीतीबाबत उच्च नीतीमुल्ये मानणारे होते. त्यामुळे त्यांच्यावर काम करणारांनी असे काम करायला नको होते. वाचकांनी हे दोन्ही लेख शेजारी ठेऊन वाचावेत, अशी विनंती करेन, असे चतुर्वेदी यांनी सांगितल्याचे वृत्त द वायरने दिले आहे.


Tags:    

Similar News