निवडणूकांमधील वचननामा फक्त निवडणूकीपुरताच, विजय वडेट्टीवार यांची कबूली

आपण वचननाम्यात जे बोलतो ते करतो का? असे म्हणत वचननामा हा फक्त निवडणूकीपुरताच असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Update: 2022-03-24 13:00 GMT

निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर सर्वच पक्षांकडून वचननामा जाहीर केला जातो. त्यातच शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडीच्या वचननाम्यात करण्यात आलेल्या घोषणेवरून मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कबुली दिली.

राज्यात निवडणूका सुरू झाल्या की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात होते. तर सर्वच पक्षांकडून निवडणूकांसाठी वचननामा जाहीर केला जातो. त्या वचननाम्यातील अनेक गोष्टींची पुर्तता होत नाही. त्यामुळे नागरिकांकडून वचननाम्यातील मुद्द्यांवरून राजकारण्यांवर टीका केली जाते. त्यातच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये मदत देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीने केली होती. त्यावरून आमदार परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मंत्री वडेट्टीवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची आकडेवारी जाहीर केली. त्यावेळी विजय वडेट्टीवार यांनी वचननामा फक्त निवडणूकीपुरताच असतो, अशा आशयाचे भाष्य केले.

विजय वडेट्टीवार यांनी राज्यात आलेल्या विविध आपत्तींमध्ये शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी दिली होती. त्यावर प्रविण दरेकर यांनी हरकत घेतली. तर तुम्ही निवडणूकीत 25 हजार रुपये एकरी मदत देणार होते. त्याचे काय झालं? असा सवाल उपस्थित केला. त्यावर उत्तर देतांना विजय वडेट्टीवार यांनी निवडणूकांच्या वचननाम्यात आपण जे बोलतो ते आपण करतो का? ते करणे शक्य तरी असते का? असे प्रश्न उपस्थित करत निवडणूकांच्या जाहीरनाम्यात केलेल्या घोषणा या फक्त निवडणूकीपुरत्याच असतात, असे स्पष्ट केले.

Tags:    

Similar News