गॅस टँकर गळतीमूळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सतर्कचेचा इशारा

Update: 2024-02-01 07:01 GMT

छत्रपती संभाजी नगर(Chhatrpati Sambhaji Nagar) : छत्रपती संभाजीनगरमील जालन्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर शहरातील वसंतराव नाईक चौकातून भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरचा रस्त्याच्या दुभाजकाला धडकुन अपघात झाला आहे, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. टँकरमधील गॅसची वेगाने गळती सुरु झाली. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले.

शहर पोलीसांनी सदर घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन परीसरातील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे, यामध्ये नागरीकांना घरातील गॅस बंद ठेवण्याचे आवाहन केले असून काही दुर्घटना होऊ नये यासाठी परीसरातील विद्युतप्रवाह खंडीत केला आहे.या घटनेची वेळीच दखल घेतली म्हणून अनर्थ टळला अन्यथा पाचशे मीटर पर्यंतच्या परीसरात या टँकरच्या आगीचा भडका उडाला असता. अग्नीशामक दलाने वेळीच तत्परता दाखवत आपलं जबाबदारी पार पाडली. असं पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीत सांगितलं.दरम्यान पोलीस प्रशासनाकडून शहराच्या मुख्य रस्त्यावरच्या वाहतुकीचा मार्ग बंद केला असून, आसपासच्या परिसरातील शाळा, महाविद्यालय तसेच ट्युशन बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Tags:    

Similar News